ह्यासोबत
- नशीब माझे ......भाग - १
- नशीब माझे . . . . भाग २
- नशीब - - माझे - - ३
- नशीब माझे - - भाग - - ४
- नशीब माझे - - भाग - ५
- नशीब माझे - - भाग - ६
- नशीब माझे - - भाग - ७
- नशीब माझे - - भाग - ८
- नशीब माझे - - भाग - ९
- नशीब माझे - भाग - १०
- नशीब माझे - भाग - ११
- नशीब माझे - भाग - १२
- नशीब माझे - भाग - १३
- नशीब त्यांचे - भेटू भाग १४
- नशीब त्यांचे - भेटू भाग १५
- नशीब त्यांचे - भाग १६
- नशीब त्यांचे - भाग १७
- नशीब त्यांचे - भाग १८
- नशीब त्यांचे - भाग १९
- नशीब त्यांचे - भाग २०
- नशीब त्यांचे - भाग २१
- नशीब त्यांचे - भाग २२
- नशीब त्यांचे - भाग २३
- नशीब त्यांचे - भाग २४
- नशीब त्यांचे - भेटू भाग - २५
- नशीब त्यांचे - भाग २६
- नशीब त्यांचे - भाग २७
- नशीब त्यांचे - भाग २८
- नशीब त्यांचे - भाग २९
- नशीब त्यांचे - भाग ३०
- नशीब त्यांचे - भाग ३१
- नशीब त्यांचे - भाग ३२
- नशीब त्यांचे - भाग ३३
- नशीब हे शिकलो - भाग ३४
- नशीब हे शिकलो - भाग ३५
- नशीब हे शिकलो - भाग ३६
- नशीब हे शिकलो - भाग ३७
- नशीब हे शिकलो - भाग ३८
- नशीब हे शिकलो - भाग ३९
- नशीब हे शिकलो - भाग ४०
- नशीब हे शिकलो - भाग ४१
- नशीब हे शिकलो - भाग ४२
- नशीब हे शिकलो - भाग ४३
- नशीब हे शिकलो - भाग ४४
- नशीब हे शिकलो - भाग ४५
- नशीब हे शिकलो - भाग ४६
- नशीब हे शिकलो - भाग ४७
- नशीब हे शिकलो - ४८
- नशीब हे शिकलो - ४९
- नशीब हे शिकलो - ५०
- नशीब हे शिकलो - ५१
- नशीब भाग - ५२
- नशीब भाग - ५३
- नशीब भाग - ५४
- नशीब भाग - ५५
- नशीब भाग - ५६
- नशीब भाग - ५७
ठरल्याप्रमाणे त्या इराण्याला भेटायला गेलो. माझे निरीक्षण बरोबर होते की नाही हे जाणून घेण्याची उत्सुकता मला पण होती. मला बघताच त्याने चेहरा वाकडा केला. कदाचित तिथल्या टेक्निशियनने घोळ केला असावा अशी कल्पना मी केली. त्याने चहा, नाश्ता मागवला व विचारले लवकरात लवकर मी किती दिवसात इराणला येऊ शकेन. मी जास्त साशंक झालो. मग तो हसला, त्याला माझी प्रतिक्रिया बघायची होती. तो पदवीधर असूनही त्याला मी सांगितलेल्या तीन गोष्टी का सुचल्या नाहीत म्हणून त्याने मला बघताच तोंड वाकडे केले होते.
२५०० रुपये महिना पगार ७०० रुपये महिन्याच्या तुलनेत चांगले वाटले. राहणे, खाणे, विमानाचे तिकीट सगळे कंपनीच्या खर्चाने. एक पानी करारावर मी हस्ताक्षर केले. किती मोठी चूक केली हे पुढे कळेलच, पण सगळ्यात महत्त्वाचे मला सगळी कडून नाकारलेल्या ह्या देशांतून बाहेर जाण्याची संधी मिळाली होती. व्हिसा, तिकीट हातात येइस्तोवर महिने कसे निघून गेले कळलेच नाही. घरात कोणाला सांगितले नाही एका शुक्रवारी संध्याकाळी हा देश सोडला. पुन्हा परतायचे नाही असे ठरवले होते.
इराण एअरच्या विमानात मीच एकटा मराठी, साधी राहणी उच्च विचार अशा थाटात जाऊन बसलो. एप्रिल १९७७. माझे सामान एक छोटी सुटकेस जी विमानात नेण्याची परवानगी होती. त्या काळात माझे शिवण यंत्र होते, माझे शिवण काम चांगले होते. मित्रांना कपडे शिवून देत असे. इराणाला जायचे म्हणून मीच शिवलेले दोन नवीन जोड एवढेच कपडे. मला बघून हवाई सुंदरी मिश्किल हसली होती. मी त्याचा अर्थ " ह्या पात्राचे विमानात स्वागत असो " असाच घेतला. कारण माझ्यातच दोष असेल असे समजण्याची सवय होती. पण नंतर कळले की ते हास्य एक कामाचा भाग होता, प्रत्येकाशी बोलताना ते हास्य कायम तिच्या चेहर्यावर मी बघितले.
विमानातील स्वागत पुस्तिका चाळायला सुरू केले. त्यात इराणी इतिहासाचे थोडेसे वर्णन होते. आर्य त्यांचे वंशज होते. मूळ भाषा संस्कृत पुढे अपभ्रौंष होवून फारसी झाली. माझे खिसे रिकामे होते त्यामुळे जे काही फुकटात मिळत होते ते खाण्या पिण्यात मी समाधानी होतो. आजूबाजूला दारूचे ग्लास एका पाठोपाठ रिकामे होत होते. काही तासात विमान जमिनीवर उतरले. सगळ्या चाचण्या संपवून मी बाहेर आलो. एक उंच माणूस माझ्या नावाची पाटी घेऊन उभा होता. मी त्याच्या कडे गेलो व माझे नाव सांगितले, त्याने त्याच्या जवळ असलेला माझा फोटो बघितला मला दाखवला, माझे मनगट धरले, पुढे तो मागे मी, असे मला खेचत गाडी जवळ घेऊन गेला. गाडीत दोन माणसे बसली होती त्यातला एक हसत बाहेर आला. स्वच्छ इंग्रजीत माफी मागत माझे स्वागत झाले. तो दुभाषी होता.
माझे मनगट धरून आणणारा आमचा वाहनचालक होता. मी दुभाष्याला माझे मनगट धरण्याचा प्रकार सांगितला, " उद्या वर्तमानपत्रात माझा फोटो येईल, रात्री विमानतळावर एक चोरटाव्यापर करणारा पकडला." त्याने ते फारसीत बाकी दोघांना सांगितले. सगळे पोट धरून हसले. मला बघून दोघांना अगदी तसेच वाटले म्हणूनच ते हसत होते. दुभाषी सांगत होता, माझ्या आधी जे भारतीय आले ते फार नाखूश होते, त्यांना घरच्यांची आठवण येत होती. पण मी त्यांना वेगळा वाटलो होतो.
विमानतळापासून कंपनीचे ठिकाण ३०० की.मी. दूर होते आमचा प्रवास सुरू झाला मी इराणी गाण्यात रमलो होतो. थोडेसे गुणगुणत होतो. मग मराठी हिंदी गाणी म्हणून दाखवली. दुभाषाने एका फारसी गाण्याचे उच्चार सांगितले मी देवनागरीत लिहून काढले. गाडीतल्या ध्वनी फितीवर दोंदा ऐकले. थोड्याच वेळात ते गाणे त्यांना म्हणून दाखवले. वाहनचालकाने तर भविष्यवाणी केली, इतर नग नीघून जातील पण हा इथेच राहील, त्याला मागे बसलेल्या दोघांनी दुजोरा दिला. बघूया इराण मला लाभदायक ठरले का - भेटू भाग - १८.