ह्यासोबत
- नशीब माझे ......भाग - १
- नशीब माझे . . . . भाग २
- नशीब - - माझे - - ३
- नशीब माझे - - भाग - - ४
- नशीब माझे - - भाग - ५
- नशीब माझे - - भाग - ६
- नशीब माझे - - भाग - ७
- नशीब माझे - - भाग - ८
- नशीब माझे - - भाग - ९
- नशीब माझे - भाग - १०
- नशीब माझे - भाग - ११
- नशीब माझे - भाग - १२
- नशीब माझे - भाग - १३
- नशीब त्यांचे - भेटू भाग १४
- नशीब त्यांचे - भेटू भाग १५
- नशीब त्यांचे - भाग १६
- नशीब त्यांचे - भाग १७
- नशीब त्यांचे - भाग १८
- नशीब त्यांचे - भाग १९
- नशीब त्यांचे - भाग २०
- नशीब त्यांचे - भाग २१
- नशीब त्यांचे - भाग २२
- नशीब त्यांचे - भाग २३
- नशीब त्यांचे - भाग २४
- नशीब त्यांचे - भेटू भाग - २५
- नशीब त्यांचे - भाग २६
- नशीब त्यांचे - भाग २७
- नशीब त्यांचे - भाग २८
- नशीब त्यांचे - भाग २९
- नशीब त्यांचे - भाग ३०
- नशीब त्यांचे - भाग ३१
- नशीब त्यांचे - भाग ३२
- नशीब त्यांचे - भाग ३३
- नशीब हे शिकलो - भाग ३४
- नशीब हे शिकलो - भाग ३५
- नशीब हे शिकलो - भाग ३६
- नशीब हे शिकलो - भाग ३७
- नशीब हे शिकलो - भाग ३८
- नशीब हे शिकलो - भाग ३९
- नशीब हे शिकलो - भाग ४०
- नशीब हे शिकलो - भाग ४१
- नशीब हे शिकलो - भाग ४२
- नशीब हे शिकलो - भाग ४३
- नशीब हे शिकलो - भाग ४४
- नशीब हे शिकलो - भाग ४५
- नशीब हे शिकलो - भाग ४६
- नशीब हे शिकलो - भाग ४७
- नशीब हे शिकलो - ४८
- नशीब हे शिकलो - ४९
- नशीब हे शिकलो - ५०
- नशीब हे शिकलो - ५१
- नशीब भाग - ५२
- नशीब भाग - ५३
- नशीब भाग - ५४
- नशीब भाग - ५५
- नशीब भाग - ५६
- नशीब भाग - ५७
मी १९८५ ला त्या नवीन जागेत गेलो. त्या इमारतीचा तो दुसरा मजला एक आंतर्राष्ट्रीय भाडेकरू संमेलन होते. २ पाकिस्तानी, १ इजिप्शियन, २ श्रीलंकांना व ३ भारतीय सगळे मिळून आठ भाडेकरू होतो. मी क्रमांक ६च्या जागेत होतो. ह्या सगळ्यात माझे कुटुंब आगळे वेगळे होते. मी पुणेरी पण बायको इराणी. बाकीची मंडळी एकेमेकाच्या गावाच्या जवळपास राहणारी होती. त्या प्रत्येक महिलेचे माझ्या बायकोशी फार चांगले संबंध होते म्हणजे किती ते बघू या.
एका सुटीच्या दिवशी सकाळी क्र.एक मधली पाकिस्तानी महीला आली. त्यांच्या घरी पाहुणे आले होते, पण चहा साखर कमी असल्याने, एक कप चहा पावडर व एक कप साखर घेऊन गेली तेही कप आमचेच होते. ते कप, चहा पावडर व साखरेने भरून तीन दिवसाने आम्हाला परत मिळाले. दोनच दिवस गेले असतील तिच बाई चिरलेली भाजी घेऊन दुपारच्या जेवणाच्या वेळेला आली, गॅस संपला म्हणून आली होती, फोडणी, मसाला, कढई आमचीच. हक्काने येऊन आमच्या कडे भाजी शिजवून नेली त्यातलीच थोडी चवीला आमच्या कडे ठेवण्याचा शेजार धर्म . . कारण मीठ आमचेच वापरले होते. खरंच ह्यांच्या रक्तातच शेजारधर्म नाही.
मला व बायकोला कधीही कोणतीही वस्तू दुसर्या कडे मागण्यात फार लाज वाटते. घरातल्या वस्तू संपल्या असतील तर त्या वस्तूला दुसरा काही तरी पर्याय शोधू पण मागायला जायचे नाही. त्यामुळे माझ्या घरात माझी पूर्ण कार्य शाळा होती व आजही आहे.
क्रमांक २ च्या जागेत इजिप्शियन जोडपे होते. त्या बाईचे फक्त डोळेच आम्हा पुरषांना दिसत होते, हातपायाच्या बोटा पासून सगळे झाकलेले असायचे. माझ्या मुलाच्या वाढदिवसाला ति बाई मुलाला घेऊन आली होती. आलेल्या प्रत्येक मुलाचा फोटो मी काढला होता. त्या मुलाचे दोन जास्तीचे फोटो त्या बाईला तिच्या आईकडे पाठवायचे होते म्हणून मी काढून दिले. तिच्या नवर्याने ते फाडून फेकून दिले होते, त्याने दिलेले कारण फार हास्यास्पद वाटले, मुलाचा फोटो काढणे धर्मा विरुद्ध होते. त्याला इंग्रजी बोलाता येत होते, मी लगेच विचारले "तुमच्यात पासपोर्ट, परवान्यावर काय चिकटवता ?"
तिथेच एक मुंबईकर जोडपे व त्यांची दोन लहान मुले माझे शेजारी होते. माझ्याच कंपनीत तो एका वेगळ्या विभागात होता, त्याला माझ्या पेक्षा बराच जास्त पगार होता पण ह्याची प्राथमिकता आगळी वेगळी होती, फक्त पैसा साठवणे, मात्र मार्ग ? ? महिना दोन महिन्याच्या सुट्टीवर घरी जाणार्या मित्रांची यादी त्याने तयार केली होती. ते मित्र सुट्टीवर गेल्यावर त्यांच्या सामानाची सुरक्षा हा घेत असे. त्यामुळे टीव्ही, घरातील आवश्यक सामान व उपकरणे त्याने तिथे असे पर्यंत कधीच विकत घेतली नव्हती. मित्रमंडळ खूप मोठे होते, महिन्यातील बर्याच रात्रीचे जेवण सह कुटुंब त्या मित्रांच्या घरी होत असे. त्याची बायको दर दोन दिवसांनी चटणी बनवण्या करिता ग्राइंडर आमचाच वापरायची.
क्र. ७ आमच्या डावीकडच्या जागेत एक मुंबईकर १७ - १८ वर्षाची नववधू होती. दुपारच्या जेवणाला आम्ही बसलो होतो, तिने आमची बेल वाजवली, मी दार उघडले, हाताला भात लागलेला, तोंडात घास, " दीदी थोडे दही आहे का, जेवायला सुरुवात केली, उशिरा लक्षात आले . . " मग तिचे माझे कडे लक्ष गेले, पण ति बिनधास्त, दही घेऊन निघून गेली. अहो एका रात्री १२ वाजता तिने सगळ्या शेजार्याना तिला वेड्यात काढायला आमंत्रणच दिले. " दिदि, आमच्या कडे पाहुणे आले आहेत, त्या बाई तुझ्या मापाची आहे तुझी मॅक्सी रात्री करिता दे ना मी सकाळी धुऊन आणून देईन." मी स्वत:ला आवरू शकलो नाही, एकतर आमच्या नाजूक वेळेला अडथळा. . वरून हे. . " ए माझ्या मापाचे काही हवे असेल तर आताच सांग . . " नंतर सहा महिने आम्ही नुसते " हे मापाचे आहे .." एवढेच म्हणून सगळे शेजारी पोट धरून हसत होतो.
अहो एकदा त्या इजिप्शियन जोडप्याने तर आम्हा सगळ्यांना तुरुंगात जाण्याचे आमंत्रण दिले. शहरात जंगलाचा अनुभव दिला. कसा - भाग ४१
जरुर भेट द्या - सुरक्षेचा खेळ ? ? ? - प्रतिमा उरि धरोनी - माझा ब्लॉग