ह्यासोबत
- नशीब माझे ......भाग - १
- नशीब माझे . . . . भाग २
- नशीब - - माझे - - ३
- नशीब माझे - - भाग - - ४
- नशीब माझे - - भाग - ५
- नशीब माझे - - भाग - ६
- नशीब माझे - - भाग - ७
- नशीब माझे - - भाग - ८
- नशीब माझे - - भाग - ९
- नशीब माझे - भाग - १०
- नशीब माझे - भाग - ११
- नशीब माझे - भाग - १२
- नशीब माझे - भाग - १३
- नशीब त्यांचे - भेटू भाग १४
- नशीब त्यांचे - भेटू भाग १५
- नशीब त्यांचे - भाग १६
- नशीब त्यांचे - भाग १७
- नशीब त्यांचे - भाग १८
- नशीब त्यांचे - भाग १९
- नशीब त्यांचे - भाग २०
- नशीब त्यांचे - भाग २१
- नशीब त्यांचे - भाग २२
- नशीब त्यांचे - भाग २३
- नशीब त्यांचे - भाग २४
- नशीब त्यांचे - भेटू भाग - २५
- नशीब त्यांचे - भाग २६
- नशीब त्यांचे - भाग २७
- नशीब त्यांचे - भाग २८
- नशीब त्यांचे - भाग २९
- नशीब त्यांचे - भाग ३०
- नशीब त्यांचे - भाग ३१
- नशीब त्यांचे - भाग ३२
- नशीब त्यांचे - भाग ३३
- नशीब हे शिकलो - भाग ३४
- नशीब हे शिकलो - भाग ३५
- नशीब हे शिकलो - भाग ३६
- नशीब हे शिकलो - भाग ३७
- नशीब हे शिकलो - भाग ३८
- नशीब हे शिकलो - भाग ३९
- नशीब हे शिकलो - भाग ४०
- नशीब हे शिकलो - भाग ४१
- नशीब हे शिकलो - भाग ४२
- नशीब हे शिकलो - भाग ४३
- नशीब हे शिकलो - भाग ४४
- नशीब हे शिकलो - भाग ४५
- नशीब हे शिकलो - भाग ४६
- नशीब हे शिकलो - भाग ४७
- नशीब हे शिकलो - ४८
- नशीब हे शिकलो - ४९
- नशीब हे शिकलो - ५०
- नशीब हे शिकलो - ५१
- नशीब भाग - ५२
- नशीब भाग - ५३
- नशीब भाग - ५४
- नशीब भाग - ५५
- नशीब भाग - ५६
- नशीब भाग - ५७
माझा मोठा मुलगा पुण्यातल्या शाळेत झालेल्या घोळामुळे बराच त्रासलेला होता. त्यात घरातील ऍपल संगणकाची जास्ती माहिती मिळत नव्हती. काही पुस्तके विकत घेतली पण फारसा फायदा झाला नाही म्हणून माझा स्टुडिओ होता त्याच इमारतीत ऍप्टेक संगणक प्रशिक्षण केंद्र होते तिथे त्याला घेऊन गेलो. तिथे कळले की ९वी शिकत असलेल्या माझ्या मुलाला १२ वी नंतरच प्रवेश मिळणार. तरीही मी मुलाला एक आठवडा प्रशिक्षण शिबिरात बसण्याची परवानगी मिळवली, तेवढे पैसे देण्याचे कबूल केले. दोन दिवस विशेष काही घडले नाही. तिसर्या दिवशी मुला बरोबर एका बॅंकेचा अधिकारी व दूरध्वनी मंत्रालयातील एक अधिकारी माझ्या स्टुडिओत आले. त्यांनी माझ्या मुलाचे कौतूक मला व बायकोला ऐकवले. त्या दिवशी प्रशिक्षण शिबिरात तिथल्या शिक्षकाने संगणक दर्शकाची (मॉनिटर) माहिती चुकीची दिली असे मुलाने पटवून दिले होते. कॅथोड रे ट्यूब स्कॅनिंग टीव्हीत व संगणकात कसे असते, कसे घडते व फरक कसा असतो हे आकृती काढून पटवून दिले होते. ति माहिती त्याने त्या वयात कोठून मिळवली ते बघण्या करता ते दोघे अधिकारी माझ्या स्टुडिओत आले होते. तिसर्या दिवशी ऍप्टेकचा प्रशिक्षक मला भेटला त्याने माझ्या मुलाला प्रशिक्षणात पूर्णवेळ प्रवेश मिळवून दिला.
आता प्रश्न होता घरात ऍप्ल संगणक व ऍप्टेक फक्त विंडोज पद्धत शिकवत होते. मग मी ऍपल विक्रेत्या कडून ऍपल संगणक पद्धतीची प्रशिक्षण पुस्तके विकत घेतली. माझ्या मुलाने दोन्ही पद्धतीचा फरक समजवून घेण्याकरता एक ४८६ विंडोज संगणक विकत घेतला व त्याचा फायदा त्याला आजही होतो. ऍप्टेक प्रशिक्षणाचे प्रमाण पत्र तीन महिन्याने मिळाले. त्यानंतर मन लावून ९ वी १० वी ची CBSE परीक्षा दिल्या व स्टुडिओत माझ्या मदतीला आला. १९९७ ला त्याने एका जाहिरात कंपनी करता आयमॅक संगणक, ५००० ल्युमेन्सचा व्हिडिओ प्रोजेक्टर व २५ वॉटची ध्वनी व्यवस्था वापरून एका मोठ्या मॉलमध्ये १८ तास चालणारी जाहिरात व्यवस्था तयार केली. तसे तो तसे तयार करणारा ओमान मधला पहिला तरुण ठरला. बर्याचशा जाहिरातीचे चित्रीकरण संपादन माझेच होते. ह्या व्यवस्थेतील काही वैशिष्ट्ये फक्त ऍपल संगणकावरच होती. ऍपल स्क्रिप्ट वापरून प्रत्येक जाहिरातीची वेळ व पुनरावृत्ती संयोजन निश्चित करता येत असे. ति जाहिरात पद्धत सुरू बंद करण्याचा वीज प्रवाह वेळ नियंत्रक देखील मी तयार केला होता. कोणत्याही नवीन जाहिरातीला माउस-कीबोर्ड न वापरता फायर वायर पद्धतीच्या साह्याने ऍपल संगणकावर चढवता येत होते. तीन महिन्यात मुलाने तशी चार अधिक जाहिरात साधने मस्कत मधील इतर मॉल मध्ये बसवून दिली. मी जेव्हा १९९८ ला मुंबईत आलो होतो तेव्हा दादरच्या रेल्वे पुलावरील विचित्र जाहिरात पद्धत बघून चकीत झालो होतो. एक मुलगा व्हिडिओ प्लेअरचा रिमोट कंट्रोल हातात घेऊन उभा होता. कॅसेट संपली की गुंढाळून पुन्हा सुरू करत होता. माझ्या मुलाने बनवून दिलेले ऑटोमेशन त्या तुलनेत फारच चांगल्या दर्जाचे होते.
त्या काळात माझा मुलगा ऍपल संगणक कंपनीचा डेव्हलपर मेंबर होता. त्याने ही तयार केलेली जाहिरात पद्धत ऍपल कंपनीला कळवली होती. त्या ओमानी जाहिरात कंपनीला माझ्या मुलावर विश्वास ठेवणे कठीण वाटले म्हणून त्या मालकाने कॅलिफोर्नियात असताना मुद्दाम ऍपल कंपनीत जाऊन जाहिरात पद्धतीची चौकशी केली होती. तिथल्या अधिकार्याने विचारपूस करून सांगितले होते की ओमान मधल्या एका भारतीयाने ही पद्धत तयार केली असून तोच जास्त माहिती देऊ शकेल. मस्कतला तो परतल्यावर त्याने मोठ्या कौतुकाने ति घटना आम्हाला सांगितली होती. माझा फोटो स्टुडिओ होता तरीही मी व मुलाने मिळून एक संगणक छपाई कागदाच्या उत्पादकाची यंत्रे दुरुस्त करून दिली होती व उत्पादन वेग वाढवण्यात यशस्वी झालो होतो.
पण आमची ही यशाची वाटचाल थांबायला व व्यावसायिक त्रासाला सुरुवात झाली. ओमानी भांडवलदाराच्या एक मैत्रिणीने आमच्या स्टुडिओचा हिशेब दाखवून मोठे कर्ज मिळवून देण्याची योजना त्याच्या डोक्यात टाकली. माझ्या एका पुणेरी मित्राला आम्ही हिशेब तपासणीचे काम दिले. दोन महिन्यात त्याने आम्हाला जागे करणारे निष्कर्ष दाखवले. सगळी कागद पत्रे दोनदा तपासून हिशेब तयार केला. ३० हजार रियाल भांडवलावर तीन वर्षात आम्ही ५५ हजार बॅंकेत जमा केले होते. त्याचा हिशेब फक्त त्या भांडवलदारालाच माहीत होता कारण बॅंकेतला पैसा काढण्याचा अधिकार मला नव्हता. वाद सुरू झाले आमचा ठरलेला पगार आम्हाला तीन वर्षात मिळाला नव्हता. घराचे भाडे मीच भरले होते. ज्या नातेवाईकाने स्टुडिओ काढण्याला मंजुरी दिली होती त्याने आम्हाला घराचे भाडे देणे कबूल केले. ज्या बॅंकेतून कर्ज मिळवण्याचा त्याने प्रयत्न केला होता तिथला प्रमुख बर्याच वेळा स्टुडिओत आला होता, त्यानेच मला कर्ज नामंजुर केल्याचे कळवले होते. भांडवलदार बिथरला होता. त्याने एक सुदानी हिशेबनीस आणला व आम्हाला त्रास देणे सुरू केले.
त्या सुदानी हिशेबनीसाने अकलेचे तारे तोडले होते. कोटेशन रक्कम + बील रक्कम + पावती रक्कम असे २०० रियाल रोख रकमेला ६०० रियाल दाखवून १९९७ च्या एका महिन्यात ५००० रियालची आम्ही अफरातफर केल्याचे एका कागदावर अरेबिक मधून लिहून तयार केले. तो फोन करायला बाहेर गेला तेव्हा ते कागद माझ्या बायकोने बघितले. तिला अरेबिक लिहिता वाचता येते हे त्या सुदान्याला माहीत नव्हते. मी त्या कागदाचा फोटो घेतला. इमारतीच्या सुरक्षा रक्षकाला बोलवले त्याला तो कागद दाखवला तो रक्षक भडकला त्याने अरबीमधून त्या सुदान्याला भरपूर दम दिला व पोलिसाला बोलवण्याच्या आत तिथून पळ काढायला सांगितले. आम्ही भांडवलदाराच्या नातेवाईकांना फोन करून बोलावले ते कागद दाखवले व स्टुडिओ त्याच घटकेला बंद करण्याची धमकी दिली. नातेवाईकांनी आमचे हिशेब कागद तपासले आणि आम्ही कोणतीही चूक केली नसल्याची पावती दिली. स्टुडिओची ति मोठी जागा सोडून समोरच्याच लहान जागेत नव्याने काम सुरू केले.
ह्या जागेत आमची ओळख ह्या लहान पॅलेस्तीनी मुलीशी झाली. मुलीचे नाव लिन, वय वर्ष ३, मला ती आमू (काका) म्हणत असे. मी तिच्याशी मराठीतून हात हालवून बोलत असे. तिला ते समजत असावे. तिची भरपूर छायाचित्रे मी काढली होती. प्रत्येक मिनिटाला ती चेहर्याचे वेगळे निरागस भाव दाखवीत असे. येणारा प्रत्येक ग्राहक तिच्याशी मैत्री करत होता. तिचे आई-वडील त्याच माळ्यावर असणार्या कापडाच्या दुकानात शिंप्याचे काम करीत होते. त्या कापड दुकानदाराने शिवण विभाग सुरू करावा ही पण माझीच कल्पना होती. कारण तो युरोपातील महागडे कापड विकत होता पण ग्राहक कपडे बिघडण्याच्या भितीने विकत घ्यायला घाबरत होते. शिवण विभाग त्यांचाच असल्याने ती भिती कमी झाली व विक्रीत वाढ झाली होती. - क्रमश:
लिनच्या छायाचित्रांचे काही नमुने कारण बरीच छायाचित्रे तिच्या आई-वडिलांनी विकत घेतली होती.
|
|
(सर्व चित्रे मोठ्या आकारमानात क्रमाने पाहण्यासाठी कोठल्याही चित्रावर टिचकी मारून सरकचित्रदर्शन सुरू करावे. )