ह्यासोबत
- नशीब माझे ......भाग - १
- नशीब माझे . . . . भाग २
- नशीब - - माझे - - ३
- नशीब माझे - - भाग - - ४
- नशीब माझे - - भाग - ५
- नशीब माझे - - भाग - ६
- नशीब माझे - - भाग - ७
- नशीब माझे - - भाग - ८
- नशीब माझे - - भाग - ९
- नशीब माझे - भाग - १०
- नशीब माझे - भाग - ११
- नशीब माझे - भाग - १२
- नशीब माझे - भाग - १३
- नशीब त्यांचे - भेटू भाग १४
- नशीब त्यांचे - भेटू भाग १५
- नशीब त्यांचे - भाग १६
- नशीब त्यांचे - भाग १७
- नशीब त्यांचे - भाग १८
- नशीब त्यांचे - भाग १९
- नशीब त्यांचे - भाग २०
- नशीब त्यांचे - भाग २१
- नशीब त्यांचे - भाग २२
- नशीब त्यांचे - भाग २३
- नशीब त्यांचे - भाग २४
- नशीब त्यांचे - भेटू भाग - २५
- नशीब त्यांचे - भाग २६
- नशीब त्यांचे - भाग २७
- नशीब त्यांचे - भाग २८
- नशीब त्यांचे - भाग २९
- नशीब त्यांचे - भाग ३०
- नशीब त्यांचे - भाग ३१
- नशीब त्यांचे - भाग ३२
- नशीब त्यांचे - भाग ३३
- नशीब हे शिकलो - भाग ३४
- नशीब हे शिकलो - भाग ३५
- नशीब हे शिकलो - भाग ३६
- नशीब हे शिकलो - भाग ३७
- नशीब हे शिकलो - भाग ३८
- नशीब हे शिकलो - भाग ३९
- नशीब हे शिकलो - भाग ४०
- नशीब हे शिकलो - भाग ४१
- नशीब हे शिकलो - भाग ४२
- नशीब हे शिकलो - भाग ४३
- नशीब हे शिकलो - भाग ४४
- नशीब हे शिकलो - भाग ४५
- नशीब हे शिकलो - भाग ४६
- नशीब हे शिकलो - भाग ४७
- नशीब हे शिकलो - ४८
- नशीब हे शिकलो - ४९
- नशीब हे शिकलो - ५०
- नशीब हे शिकलो - ५१
- नशीब भाग - ५२
- नशीब भाग - ५३
- नशीब भाग - ५४
- नशीब भाग - ५५
- नशीब भाग - ५६
- नशीब भाग - ५७
कंपनीच्या क्रिमवेफर बिस्किट प्रकल्पातील त्या वीज दुरुस्तीवाल्याचा शोध माझ्यामुळे शंकाग्रस्त झाला होता. त्या दिवशी मी घरी जात असताना (त्या शोधक इराण्याच्या घरासमोरूनच जावे लागत असे) एका सोबत्याने माझी विचारपूस केली म्हणून मी थांबलो, मी एक विनोद केला म्हणून माझा हात धरून त्याने मला जवळ ओढले. त्याचक्षणी मला काही तरी चावले असे वाटले म्हणून आम्हा दोघांचे लक्ष माझ्या हाताकडे गेले. कोपराच्या थोडे वर जखम झाली होती व त्यातून रक्त वाहू लागले होते. माझ्या बरोबरच्या सोबत्याला एअर रायफलचा परिचित आवाज ऐकायला आला होता, त्याचे लक्ष समोरच्या खिडकीत रायफल घेऊन उभ्या असलेल्या त्या शोधक इराण्या कडे गेले, त्याला रायफल चालवलीसका म्हणून विचारले, त्या शोधकाने हसतच सांगितले झाडावरच्या चिमण्या मारत होतो. झाड आम्ही उभे होतो तेथून दूर होते शिवाय रायफलवर दुर्बीण बसवलेली होती. माझ्या बरोबरच्या सोबत्याने त्याला शिव्या घालायला सुरुवात केली.
आजूबाजूच्या घरातून मंडळी धावत बाहेर आली. माझ्या हातावर रुमाल बांधून एका मित्राने जवळच्या सरकारी दवाखान्यात नेले तिथे असणारे डॉक्टर भारतीय मित्रच होते. जखमेला अर्धा तास झाला होता. हात सुजायला सुरुवात झाली होती. वेगाने शल्यक्रीयेची तयारी करून जखमेच्या बाजूने दीड इंच जागा उघडण्यात आली. एअर रायफलची छोटी गोळी सापडली. गोळीच्या बाजूने रंग बदलायला सुरुवात झाली होती. सुरुक्षा म्हणून बाजूचा शक्य होता तेवढा मासाचा भाग काढून टाकला जखम दोनदा औषधाने स्वच्छ धुतली, टाके घालून बंद केली. डॉक्टर मित्राचे घर त्या सरकारी दवाखान्यातच होते. मी, बायको व इतर नातेवाईक चार तास त्याच्या घरातच तपासणी करता बसलो.
तिकडे कंपनीत पोलिस गेले, त्या शोधक इराण्याला ताकीद देऊन गेले होते. मला ५ दिवस रोज डॉक्टरला भेटावे लागले. त्या गोळीचे दुष्परिणाम झाले नव्हते. सगळ्यांनी मशादला एमाम रेझाच्या झियारदगाला (दर्शनस्थळ) भेट देण्याचा आग्रह केला. जाऊन येऊन २६०० किलोमीटर प्रवास होता. माझा उजवा हात ताठ घट्ट बांधल्यामुळे वाकत नव्हता मी स्टेअरिंग धरून होतो बायको गियर बदली करायची असा सगळा प्रवास केला. माझी पेकान स्टेशनवॅगन गाडी होती त्यामुळे मागची सीट खाली टाकून दोन रात्री गाडीतच झोपलो होतो. प्रवास फार छान झाला. वाटेत दिसलेली गावं, शहरं, निसर्ग एक वेगळा आनंद मिळाला.
एमाम रेझा दर्शनस्थळ आणि आपली भारतीय दर्शनस्थळे ह्यात सर्वार्थाने साम्य दिसले. श्रद्धा, भोंदूगिरी, नवस फेडणे सगळे इथे अनुभवतो तसेच होते. मी आस्तिक आहे, ह्या शक्तीचे अस्तित्व मला मान्य आहे, आदर आहे, पण का कोणास ठाऊक कोणत्याही प्रकारची श्रद्धा माझ्या मनात नाही. कारण श्रद्धा, अनुभुती वगैरे सगळे मानव सापेक्ष आहे. ह्या सगळ्या शक्तीचा अनुभव, प्रकट रूप स्पंदनामुळे ( फ्रिक्वेन्सी स्पेक्ट्रम ) घडते असा माझा अनुभव आहे. प्रत्येक वस्तूच्या, व्यक्तीच्या स्पंदन क्षमतेशी त्याचे नाते आहे. म्हणूनच व्यक्ती तितक्या प्रकृती वगैरे. असो, हेच पाहाना मी नवीन गाडी घेतली, माझे भले व्हावे, अपघात टळावे म्हणून बोकड कापायचे, अहो मी जिवंत राहावे म्हणून एकाचा जीव संपवण्याचा मला काय अधिकार ? मंत्र म्हणा, नमस्कार करा, त्या क्षणाला चार भुक्या पोटांना जेवू घाला. तेही खरेच, कोणते मंत्र, पाठकाची समज व क्षमतेची शंका आहेच. गाणार्याच्या क्षमते वर परिणाम अवलंबून असतो.
दोघे सुखरूप घरी आलो. कंपनीचे काम रोज होते तसेच सुरू होते. तो शोधक इराणी अजून गोंधळ घालण्यात मग्न होता. त्याने तयार केलेला एक उष्णता नियंत्रक कंपनीला ९० हजाराला वीकण्या करता आणला. त्या खरेदी बैठकीत मला त्या विषयातला माहितगार म्हणून बोलावले होते. त्या बैठकीतल्या एका अधिकार्याने एक असंबद्ध मुद्दा शोधून काढला, "एक इराणी जर उष्णता नियंत्रक तयार करू शकतो तर हा परदेशी कोणत्या कामा करता आहे ? ह्याला काढून टाका." दुसर्या अधिकार्याने मला विचारले "बाहेरून विकत घेण्याऐवजी कंपनीत बनवणे शक्य आहे का ?" मी - "सुटे भाग इराणमधे मिळत नाही असे खरेदी विभागाने मला नेहमी सांगितले आहे. सुटे भाग विभागात मी ह्या नियंत्रकांची मोठी संख्या बघितली आहे. सध्यातरी नवीन आवश्यक नसावेत." सुटे भाग विभाग प्रमुखाने बॉम टाकला " गेल्या सहा महिन्यात त्या शोधकाने ४५ नियंत्रक नेले होते व एकही नादुरुस्त परत केला नव्हता." सुरक्षा विभाग प्रमुखाने शोधकाच्या पिशवीत दोन वेळा असे नियंत्रक पकडले होते. तेव्हा त्याला ताकीद देऊन सोडून दिले होते.
तो इराणी शोधक भडकला " हा एक तुच्छ हिंदी मला चोर म्हणतो, ह्याला मी संपवतोच." त्याने पोशाखात लपवलेले भरलेले पिस्तूल माझ्यावर रोखले ( क्रांती नंतर सगळ्या प्रकारची हत्यारे सहज उपलब्ध होती, ६ - ७ वर्षाच्या मुला मुलींचे ए.के. ४७ मशिनगन उघडझाप करण्याच्या शर्यती आयोजीत केल्या जात होत्या ) त्याच्या शेजारी बसलेल्या अधिकार्याला आमच्या भांडणाची कल्पना होती, त्याने क्षणात त्याच्या पिस्तुलावर जोरात हात मारला, पिस्तूल उडाले गोळी सुटण्याचा आवाज आला. नशीब आम्हा सगळ्यांचेच कोणी जखमी झाले नाही. पुन्हा पोलिसात तक्रार झाली नाही, का ते विचारणे शक्यच नव्हते. मी भारतीय दूतावासात गेलो, मला "इंडियन" असल्याची घृणा तिथून सुरू झाली. - भेटू भाग - २९
सूचना - कोणाला माझ्या आवाजात ह्या मालिकेचे वाचन ऐकायचे असेल तर स्काईप आयडी व्हीकेआर - स्किलसव्हीके संपर्क साधावा. एक प्रयोग.