ह्यासोबत
- नशीब माझे ......भाग - १
- नशीब माझे . . . . भाग २
- नशीब - - माझे - - ३
- नशीब माझे - - भाग - - ४
- नशीब माझे - - भाग - ५
- नशीब माझे - - भाग - ६
- नशीब माझे - - भाग - ७
- नशीब माझे - - भाग - ८
- नशीब माझे - - भाग - ९
- नशीब माझे - भाग - १०
- नशीब माझे - भाग - ११
- नशीब माझे - भाग - १२
- नशीब माझे - भाग - १३
- नशीब त्यांचे - भेटू भाग १४
- नशीब त्यांचे - भेटू भाग १५
- नशीब त्यांचे - भाग १६
- नशीब त्यांचे - भाग १७
- नशीब त्यांचे - भाग १८
- नशीब त्यांचे - भाग १९
- नशीब त्यांचे - भाग २०
- नशीब त्यांचे - भाग २१
- नशीब त्यांचे - भाग २२
- नशीब त्यांचे - भाग २३
- नशीब त्यांचे - भाग २४
- नशीब त्यांचे - भेटू भाग - २५
- नशीब त्यांचे - भाग २६
- नशीब त्यांचे - भाग २७
- नशीब त्यांचे - भाग २८
- नशीब त्यांचे - भाग २९
- नशीब त्यांचे - भाग ३०
- नशीब त्यांचे - भाग ३१
- नशीब त्यांचे - भाग ३२
- नशीब त्यांचे - भाग ३३
- नशीब हे शिकलो - भाग ३४
- नशीब हे शिकलो - भाग ३५
- नशीब हे शिकलो - भाग ३६
- नशीब हे शिकलो - भाग ३७
- नशीब हे शिकलो - भाग ३८
- नशीब हे शिकलो - भाग ३९
- नशीब हे शिकलो - भाग ४०
- नशीब हे शिकलो - भाग ४१
- नशीब हे शिकलो - भाग ४२
- नशीब हे शिकलो - भाग ४३
- नशीब हे शिकलो - भाग ४४
- नशीब हे शिकलो - भाग ४५
- नशीब हे शिकलो - भाग ४६
- नशीब हे शिकलो - भाग ४७
- नशीब हे शिकलो - ४८
- नशीब हे शिकलो - ४९
- नशीब हे शिकलो - ५०
- नशीब हे शिकलो - ५१
- नशीब भाग - ५२
- नशीब भाग - ५३
- नशीब भाग - ५४
- नशीब भाग - ५५
- नशीब भाग - ५६
- नशीब भाग - ५७
माझे छाया चित्रण चांगले होते हे माझ्या त्या कंपनीच्या गुजराथी प्रमुखाला माहीत होते. त्याने मला त्याच्या घरी बोलावून नव्याने केलेल्या घर सजावटीची (घर-सजावट कंपनीचे होते) छायाचित्रे काढायला बोलावले होते. ३६ चित्राची ३ रिळे संपली, त्याचा छपाईचा खर्च त्या प्रमुखाने दिला. २ महिन्या नंतर - हॅपी होम - नावाचे ब्रिटिश मासिक वाचताना मी काढलेले ते फोटो मला दिसले.छायाचित्रकार म्हणून व त्याने न केलेल्या घर सजावटीचे वर्णन त्या प्रमुखाने स्वत:चे नाव लावलेहोते, सगळेच खोटे. त्यामुळे अशा प्रत्येक प्रसिध्दी मिळणार्या ह्या धेंडांच्या कोणत्याही वाक्याची / कामाची मला नेहमी शंका असते. असेच विचार मी कंपनीत बोलून दाखवले होते.
त्या प्रमुखाने अजून बराच मोठा हात मारला होता. कंपनीचा दर आठवड्याला आयात होणारा माल बोटीतून उतरवून कंपनीत आणायला एक ट्रक + ४ मजूर वापरायचे पण ३ - ४ ट्रक व १० मजुरांचा खर्च दाखवून खिशात घालण्याची "हुशारी" त्याने दाखवली होती. हे त्या मजुरांनी मला सांगितले होते. कदाचित हा उच्च शिक्षणाचा अभ्यासक्रम असावा कारण असे काम करण्याचा जणू परवानाच ह्या उच्च पदस्ताना दिलेला असतो, त्यातले काही उपयोग करायचे विसरत असावेत, इतक्या मोठ्या पुस्तकांतून काही पाने वगळली जात असावीत.
माझी नोकरी सुटलेली होती, १ महिन्याच्या सूचनेचा उपयोग करून मी ओमानला काम करण्याचा दुसरा परवाना मिळवला. बायको व मुलांचा राहण्याचा परवाना सहा महिन्या नंतर बदलणार होता. छाया / चल चित्रणाच्या व्यवसायातून घर चालवणे सहज शक्य होते, तसा सवलत असलेला परवाना मिळवणे फार आवश्यक होते. एकाच्या ओळखीने तसा परवाना मिळाला परंतू परवाना देताना मध्यस्ती जास्त पैशाची मागणी करू लागला. मी थोडा वेळ मागून घेतला व मूळ परवाना देणार्या मालकाचा शोध सुरू केला. एका हॉटेल मालकाशी आमची चांगली ओळख झाली होती त्याला माझी परिस्थिती समजवून सांगत असताना मूळ मालकाचे नाव मी सांगितले योगायोग असा की त्याचाही परवान्याचा मालक तोच माणूस होता. त्याने त्याच्या घरचा पत्ता दिला. मी बायकोला घेऊन त्याच्या घरी गेलो व त्याला वस्तुस्थिती समजावून सांगितली.
मध्यस्ती करणार्या माणसाने त्याला फसवले हे त्याला समजले. त्या मालकाने माझे काम फार कमी पैशात करून दिले, तो माणूस विमान
तळाच्या सुरक्षा पोलीस दलात काम करत होता. मध्यस्ती करणार्याला ते सगळे समजल्यावर त्याने आम्हाला जीवे मारण्याची धमकी दिली व
दुसर्या दिवशी तो रस्त्यावर अपघात घडवणार होता. त्याचे बोलणे आम्ही ध्वनी मुद्रण सोय असलेल्या फोन वर मुद्रित केले होते. मी ते परवाना देणार्या त्या पोलिसाला ऐकवले. त्याने मध्यस्ति करणार्याला माझ्या घरी बोलावले होते. मध्यस्ति बायकोला घेऊन आमच्या घरी आला, तो एक गुजराथी होता. ध्वनी मुद्रण ऐकताच आमचे पाय धरून रडायला लागला. त्या मालकाने ती ध्वनी फीत स्वत:च्या खिशात ठेवली व त्या मध्यस्ति माणसाला बजावले. आम्हा चौघांना काही झाले तर त्याला व त्याच्या बायकोला तुरुंगात पाठवायला ति फीत उपयोगी ठरेल.
पोलिस मित्राची बायको माझ्या बायकोची मैत्रीण झाली. त्याच्या ओळखीने छाया / चल चित्रणाची नवीन कामे मिळाली. त्या कामातून पैसे जमवून मी एक ब्रोनीका एस्क्युए प्रतिमा ग्राहक - प्रग्रा - ( कॅमेरा ) विकत घेतला. ह्या प्रग्राचे प्रत्येक भाग सुटे करता येतात व आवश्यकते नुसार जोडता येण्याची सोय असते. ६ से. मी. चौकट असलेले चित्र रीळ ह्यात वापरतात. हे चित्र रीळ एका छोट्यापेटीत (फिल्म बॅक) ठेवण्याची व्यवस्था असते. ही पेटी काढघाल करता येते. मी तशा दोन पेट्याविकत घेतल्या. बदलता येणारी तत्काळ ६ से. मी. चौकट चित्र प्रतिमा तयार करणारी छपाई कागद पेटी (पोलरॉईड बॅक) मी विकत घेतली. तत्काळ प्रतिमा छपाईमुळे छायाचित्रातील उजेड व रंग ह्यात होणारे बदल व अपेक्षित परिणाम ह्यांची तपासणी काही क्षणात सहज करता येते. ११० मी.मी. चे जमो - जवळून मोठे - (मॅक्रो लेन्स) व ४५ मी.मी.चे रुंद कोनी (वाइड ऍन्गल) असे दोन भिंग विकत घेतले. ह्या प्रग्रा संचाने मी छायाचित्राची बरीच मोठाली कामे केली. ह्याच प्रग्राला चित्रफीत पेटीच्या जागी नव्याने तयार केलेली २५ ते ५६ दशलक्ष चित्रपेशींची (मेगा पिक्सेल्स) डिजीटल पेटी बाजारात उपलब्ध आहे, पण २ ते ५ लाख रुपये मोजावे लागतात म्हणून मी अजून विकत घेऊ शकलो नाही.
त्या पोलिसवाल्या परवाना मालकाचा नातेवाईक माझ्या कामात त्रासदायक ठरू लागला व सुदैवाने सुक्ष्मचित्र फीत सेवा (मायक्रोफिल्म) कंपनीत सेवा प्रमुखाची नोकरी चालून आली. त्या कंपनीत काम करण्याचा परवाना मिळण्या करता तेव्हाच्या त्या पोलिसवाल्या परवाना मालकाला ८०० रियाल द्यावे लागले. थोडक्यात नवीन परवाना विकत घ्यावा लागला - क्रमश: -