ह्यासोबत
- नशीब माझे ......भाग - १
- नशीब माझे . . . . भाग २
- नशीब - - माझे - - ३
- नशीब माझे - - भाग - - ४
- नशीब माझे - - भाग - ५
- नशीब माझे - - भाग - ६
- नशीब माझे - - भाग - ७
- नशीब माझे - - भाग - ८
- नशीब माझे - - भाग - ९
- नशीब माझे - भाग - १०
- नशीब माझे - भाग - ११
- नशीब माझे - भाग - १२
- नशीब माझे - भाग - १३
- नशीब त्यांचे - भेटू भाग १४
- नशीब त्यांचे - भेटू भाग १५
- नशीब त्यांचे - भाग १६
- नशीब त्यांचे - भाग १७
- नशीब त्यांचे - भाग १८
- नशीब त्यांचे - भाग १९
- नशीब त्यांचे - भाग २०
- नशीब त्यांचे - भाग २१
- नशीब त्यांचे - भाग २२
- नशीब त्यांचे - भाग २३
- नशीब त्यांचे - भाग २४
- नशीब त्यांचे - भेटू भाग - २५
- नशीब त्यांचे - भाग २६
- नशीब त्यांचे - भाग २७
- नशीब त्यांचे - भाग २८
- नशीब त्यांचे - भाग २९
- नशीब त्यांचे - भाग ३०
- नशीब त्यांचे - भाग ३१
- नशीब त्यांचे - भाग ३२
- नशीब त्यांचे - भाग ३३
- नशीब हे शिकलो - भाग ३४
- नशीब हे शिकलो - भाग ३५
- नशीब हे शिकलो - भाग ३६
- नशीब हे शिकलो - भाग ३७
- नशीब हे शिकलो - भाग ३८
- नशीब हे शिकलो - भाग ३९
- नशीब हे शिकलो - भाग ४०
- नशीब हे शिकलो - भाग ४१
- नशीब हे शिकलो - भाग ४२
- नशीब हे शिकलो - भाग ४३
- नशीब हे शिकलो - भाग ४४
- नशीब हे शिकलो - भाग ४५
- नशीब हे शिकलो - भाग ४६
- नशीब हे शिकलो - भाग ४७
- नशीब हे शिकलो - ४८
- नशीब हे शिकलो - ४९
- नशीब हे शिकलो - ५०
- नशीब हे शिकलो - ५१
- नशीब भाग - ५२
- नशीब भाग - ५३
- नशीब भाग - ५४
- नशीब भाग - ५५
- नशीब भाग - ५६
- नशीब भाग - ५७
१९७६ बरेच महिने एका मोठ्या प्रकल्पावर राहून मी परतलो होतो. मित्रानं बरोबर मौज मस्ती, खाणे-पिणे चालू होते. थकून घरी गेलो आणि कळले गावा कडे माझ्या बाबांचे निधन झाले, त्याच घटकेला माझी मौज मस्ती चालू होती. बाबा गेले तेव्हा त्यांच्या जवळ फक्त मोठा भाऊ व वहिनी होती. आम्ही बाकी भावंड बाहेर गावी होतो. सकाळच्या वेळात जरा आडवा होतो असे सांगून जे पलंगावर झोपले ते कायमचे. आम्ही सगळे गावा कडे आपापल्या राहत्या गावातून पोहोचलो तोवर ४८ तास उलटून गेले होते. बाबांचा मृत देह बर्फाच्या लादीवर ठेवावा लागला होता. काय बघा नशीब त्यांचे.
त्याच महिन्यात मी एक जाहिरात वाचून नोकरी करता अर्ज केला होता त्याचे बोलवणे मला आले. नोकरी इराणच्या एका बिस्किट कंपनीत इलेक्ट्रॉनिक टेक्नीशीयन म्हणून होती. अर्जात मी माझे तांत्रिक विषय घेऊन माध्यमिक शिक्षण झाल्याचे लिहिले होते त्याच बरोबर " यू नेम इट आय डू इट " - तुम्ही म्हणाल ते काम मी करतो / मी केलेले आहे - १९६५ पासून केलेल्या कामाचा अनुभव नमूद केला होता. मुलाखत घेणारा इराणी अमेरिकेत वीज तंत्रज्ञानातील पदवीधारक / सुवर्ण पदक विजेता होता. माझे वरील वाक्य त्याला उर्मटपणाचे वाटले होते, म्हणून मुद्दाम मला धडा शिकवायचा ह्या उद्देशाने मुलाखतीला बोलावले होते तसे त्याने बोलून दाखवले. मुलाखत मुंबईच्या ताज मध्ये होती.
प्रश्न १ - तुझ्या अनुभवातून तू बिस्किट प्लान्ट मध्ये काम केल्याचे दिसत नाही. वगैरे.
उत्तर - बिस्किट प्लान्ट मध्ये मोटर विजेवरच चालत असणार त्याचे वेग नियंत्रण थायरिस्टरनेच होत असणार त्याचे प्रश्न व दोष विचारा मी सांगू शकेन.
प्रश्न २ - एखाद्या मोटरचा फ्यूज जळल्यास मोठा फ्यूज बदलणे योग्य आहे का ?
उत्तर - नाही. त्याच क्षमतेचा फ्यूज बदलून जर लगेच जळला तर दोष कशामुळे निर्माण झाला ह्याचा शोध घेणे आवश्यक आहे.
त्याला इलेक्ट्रॉनिक भागातील माहिती कमी होती ह्याची कबुली त्याने दिली. त्याने मला मोटर वेग नियंत्रण कसे होते हे समजवून देण्यास सांगितले, शिक्षण संस्थेत हा प्रकार समजवून सांगण्यात मी प्रसिद्धी मिळवली होती, त्यामुळे सरळ साध्या भाषेत त्याला मी सांगू शकलो. त्याने मला शाबासकी दिली. मीच त्याला सांगितले, मुलाखती करता वीज उपकरणांचे नियंत्रण नकाशे आणले असतील तर इथे बसून मी तुमच्या कंपनीत ह्या घटकेला वीज उपकरण विषयीचा बिघाड दुरुस्त करून देईन. योग बघा जुळून आले होते, त्याचा फोन वाजला, त्याने फारसी भाषेतून संभाषण केले. त्याचा चेहरा खुलला. माझे म्हणणे पडताळून पाहण्याची संधी चालून आली होती. बिस्किट थंड करणार्या पट्ट्याची एक मोटर जळली असे समजून मोटर बदली केली परंतू सारखा फ्यूज जळत होता व शेवटी नियंत्रक जळला होता. " तू हा प्रश्न सोडवला तर लगेच तुला इराणला घेऊन जाईन नाहीतर खोटे बोलून फसवणूक केली म्हणून पोलिसाला बोलवीन." मी मोटर आणि पट्ट्याविषयची अधिक माहिती त्याच्या कडून मिळवली. त्याला तीन गोष्टी मोजायला सांगितल्या.
१ - गिअर बॉक्स पासून मोटार वेगळी करून वीज प्रवाह व वेग माहिती पत्रक प्रमाणे आहे का?
२ - गिअर बॉक्सचा मोटरला जोडणार्या भागावर टॉर्क मीटर लावून अपेक्षीत टॉर्क आहे का? तोच जास्त असणार असे माझे मत होते.
३ - पट्ट्याशी संबंधीत सगळे फिरणारे भाग सहज फिरत आहेत का ?
ह्या सगळ्याची चाचणी करण्यात बराच वेळ लागणार होता. त्याला अजून बर्याच जणांच्या मुलाखती संपवायच्या होत्या. माझ्या पेक्षा जास्त शिकलेले व अनुभवी अर्जदार मुलाखतीला बोलवले होते. दोन दिवसांनी निश्चित परत भेटायला येण्याचे आश्वासन देऊन मी बाहेर पडलो - बघूया त्याच्या व माझ्या नशिबात काय लिहिले आहे. - भेटू भाग - १७.