ह्यासोबत
- नशीब माझे ......भाग - १
- नशीब माझे . . . . भाग २
- नशीब - - माझे - - ३
- नशीब माझे - - भाग - - ४
- नशीब माझे - - भाग - ५
- नशीब माझे - - भाग - ६
- नशीब माझे - - भाग - ७
- नशीब माझे - - भाग - ८
- नशीब माझे - - भाग - ९
- नशीब माझे - भाग - १०
- नशीब माझे - भाग - ११
- नशीब माझे - भाग - १२
- नशीब माझे - भाग - १३
- नशीब त्यांचे - भेटू भाग १४
- नशीब त्यांचे - भेटू भाग १५
- नशीब त्यांचे - भाग १६
- नशीब त्यांचे - भाग १७
- नशीब त्यांचे - भाग १८
- नशीब त्यांचे - भाग १९
- नशीब त्यांचे - भाग २०
- नशीब त्यांचे - भाग २१
- नशीब त्यांचे - भाग २२
- नशीब त्यांचे - भाग २३
- नशीब त्यांचे - भाग २४
- नशीब त्यांचे - भेटू भाग - २५
- नशीब त्यांचे - भाग २६
- नशीब त्यांचे - भाग २७
- नशीब त्यांचे - भाग २८
- नशीब त्यांचे - भाग २९
- नशीब त्यांचे - भाग ३०
- नशीब त्यांचे - भाग ३१
- नशीब त्यांचे - भाग ३२
- नशीब त्यांचे - भाग ३३
- नशीब हे शिकलो - भाग ३४
- नशीब हे शिकलो - भाग ३५
- नशीब हे शिकलो - भाग ३६
- नशीब हे शिकलो - भाग ३७
- नशीब हे शिकलो - भाग ३८
- नशीब हे शिकलो - भाग ३९
- नशीब हे शिकलो - भाग ४०
- नशीब हे शिकलो - भाग ४१
- नशीब हे शिकलो - भाग ४२
- नशीब हे शिकलो - भाग ४३
- नशीब हे शिकलो - भाग ४४
- नशीब हे शिकलो - भाग ४५
- नशीब हे शिकलो - भाग ४६
- नशीब हे शिकलो - भाग ४७
- नशीब हे शिकलो - ४८
- नशीब हे शिकलो - ४९
- नशीब हे शिकलो - ५०
- नशीब हे शिकलो - ५१
- नशीब भाग - ५२
- नशीब भाग - ५३
- नशीब भाग - ५४
- नशीब भाग - ५५
- नशीब भाग - ५६
- नशीब भाग - ५७
इराण्यांना शहाच्या विरुद्ध क्रांती केल्याचे फार अप्रूप वाटले. येणार्या मु्ल्लाराजवटीने असाध्य वचने देऊन भुरळ पाडली. हे कळायला त्यांना अजून किती वर्ष सोसावे लागेल खुदा जाने. असाध्य गुळमुळीत वचने देण्याचे हक्क खरेतर इंडियनाइज्ड राजकारण्यांचे आहेत ( भारतीय म्हणवून घेणे त्यांना कबूल नाही, मला तर बर्याच बाबतीत ह्यांना भारतीय मानणे तमाम स्वातंत्र्यवीरांचा अपमान केल्या सारखा वाटतो ).
मी एकटा भारतीय त्या कंपनीत उरलो होतो. ज्या दिवशी माझे सगळे भारतीय मित्र कंपनी सोडून गेले त्याच्या दुसर्या दिवशी सकाळी मुख्य दरवाज्यातील वेळमुद्रण यंत्राशी ( एंट्री टाइम प्रिंटर ) रोज असते तशीच गर्दी जमली होती. मी पण होतो, तेवढ्यात एक रॅश्ती पुढे आला. इथे रॅश्तीचा अर्थ समजणे महत्त्वाचे आहे. रॅश्त एका शहराचे नाव आहे त्या आजूबाजूच्या गावातील मंडळींना रॅश्ती गणले जाते. ही मंडळी थोडीशी गावठी, "ट्युबलाईट", उद्धट, लसूण खाणारे वगैरे असतात. आपण दक्षिणी लोकांना जसे मद्रासी व पंजाब्यांना सरदार म्हणून विनोदात गुंफवतो तसेच काहीसा रॅश्ती हा प्रकार आहे. एसफहानी = कंजूस तर तोर्क = ताब्रीझ भागातील बनीये, सर्व अर्थाने.
असो, त्या रॅश्तीने माझे खांदे धरले, मोठ्या उत्साहात सांगू लागला - " सगळ्या भारतीयांना चुटकी सरशी बाहेर फेकून दिले, बघ आमची इराणी ताकद !" मी - " त्यांच्या पगारातला कितवा हिस्सा तुला मिळणार आहे. ह्या उलट आज पासून किती यंत्रातून बिघाड झाल्याने उत्पादन कमी होणार त्याचा हिशेब तुला कधीच कळणार नाही." तो हार मानणारा नव्हता. त्याने हवेत सदर्याची कॉलर पकडल्याचे नाटक करीत सांगितले -" अशी कॉलर धरून एक एक लाथ घातली प्रत्येकाच्या कुल्ल्यावर" असे म्हणत त्याने एक लाथ हवेत मारली ती समोरून येणार्या एका इराण्याला लागली. तो लाथ बसल्याने एकदम भडकला. मी जोरात ओरडलो - " अरे बघा आवरा ह्या रॅश्तीला, हा मागचा जन्म आठवल्याच्या खुशीत लाथा झाडतो आहे." हे मी फारसी भाषेत सांगितल्यामुळे सगळे मोठ्याने हसायला लागले.
असेच एका सकाळी चहा नाश्त्याला नेहमीचे इराणी मित्र जमलो होतो. क्रांतीच्या धुंदीने काम थंडावले होते. त्यातला एक हातात लाकडी काठी घेऊन आला, प्रत्येकाच्या डोक्यावर मारत माझ्या पर्यंत आला. सगळ्यांच्या डोक्याचा ट्ण्ण आवाज आला, माझ्या डोक्याचा दबलेला आला. तो काठीवाला - " व्हीके बघ इराणी डोके कसे भरलेला आवाज देतो, तुझे डोके कसे भुसभुशीत, आवाज देत नाही." मी - " माझे डोके जमिनी सारखे सुपीक आहे, काहीही पेरा लगेच फळ मिळेल, तुमचे डोके इतके कडक काही आत शिरायला / बाहेर पडायला जागाच नाही." सगळे त्याच्या वर चिडले - " ए रॅश्ती तुला नाही कळायचे, एका वाक्यात आम्ही सगळे मठ्ठ डोक्याचे आहोत, असे व्हीके सांगून गेला, चूप बस, त्याच्या पासून तू दूर राहा." असो.
क्रांती पूर्वी विजेचे भार नियम कमी होते, ते क्रांती नंतर फार वाढले. दर तासा दोन तासांनी पुरवठा एकदम बंद होणे वाढले. त्यात ५ मेगा वॉट चा जनरेटर चालू बंद करण्यात जास्त वेळ लागत असे. म्हणून त्याची स्वयंचलित पद्धत करून देण्याचे ठरले. तशी इलेक्ट्रॉनिक नियंत्रणाची पद्धत त्या जनरेटर वर होती पण त्याची जोडणी केलेली नव्हती. ती मी यशस्वी रित्या करून दिली. मग २२,००० व्होल्टचा सरकारी वीज पुरवठा स्वयंचलित करणे आवश्यक झाले. माझ्या जवळ ते काम करण्याचा आंतर्राष्ट्रीय परवाना नव्हता. तसले काम करणारे इंजिनिअर देश सोडून गेलेले असल्याने कंपनी व्यवस्थापनेने ते काम मी करावे अशी परवानगी मिळवली. हत्यारांची जुळवाजुळव केली. व वीज कपातीचा दिवस निश्चित झाला. मी मोजक्या इराणी सहकार्याना घेऊन कामाला सुरुवात केली. १० चं मिनिटे झाली असतील एका क्षणाकरता आमचे डोक्यावरचे अंगावरचे केस एकदम ताठरले व खूप मोठा स्फोट झाला लोकांची धावाधाव सुरू झाली. पायाखालची जमीन चांगलीच हादरली होती. इराणी सहकार्यांनी मला मिठी मारली. का ? - भेटू भाग - २७.