मराठी भाषेद्वारे होणारे 'नाविक हाल'

मराठी भाषकांना, लेखकांना, वृत्तपत्रांना इतर भाषांतली मूळ नावे बरोबर माहीत नसतात. ह्यालाच भाषेच्या जाणकारांनी 'नाविक हाल' असे म्हटले आहे. त्यांच्या मते, इंग्रजांनी आपले जे 'नाविक हाल' केले आहेत ते आणि ते करण्याची जी सवय लावली आहे ती, दोन्ही आपण तसेच ठेवले असावेत. पुढील उदाहरणं बोलकी आहेत.


"थंड हवेचं ठिकाण सिमला नसून शिमला आहे. पंजाबातील मोठं धरण भाकरा नसून भाखडा आहे. आणि जवळच्या गावाचं नाव नानगल नसून नंगळ आहे. पुढे काही नावं दिली आहेत. आपण करीत असलेले चुकीचे उच्चारही (कंसात) दिले आहेत. मदनलाल ढींग्रा (धिंग्रा), पटौदी (पतौडी), ढील्लों (धिल्लन), ढवण (धवन), पटियाळा (पतियाला), चंडीगढ(चंदीगड) हरियाण (हरयाना) (ह्या कृष्णाच्या,म्हणजेच हरीच्या यानाचा मार्ग ह्या प्रदेशातून जात होता. म्हणून ह्या प्रदेशाचं नाव हरियाण. 'र' मुळं 'न' चा उच्चार 'ण' होतो. हे संस्कृत-जाणकारांना माहीतच आहे.)"

आम्ही इतर प्रांतीयांचे असे अनन्वित 'नाविक हाल' करत असतो.  इथे त्याची सांगोपांग चर्चा व्हावी.

चित्तरंजन


संदर्भः
१ श्री. नानासाहेब टिळक ह्यांचा 'भाषा आणि जीवन' च्या उन्हाळा १९९५ (१३.२) अंकातील 'नाविक हाल' हा लेख. पृ.२०
२. श्री मनोहर राईलकर ह्यांचा 'भाषा आणि जीवन' च्या दिवाळी १९९७ (१५:४) अंकातील ह्या लेखावरील प्रतिसाद 'नाविक हाल (एक प्रतिसाद)' पृ.५९