ह्यासोबत
- नशीब माझे ......भाग - १
- नशीब माझे . . . . भाग २
- नशीब - - माझे - - ३
- नशीब माझे - - भाग - - ४
- नशीब माझे - - भाग - ५
- नशीब माझे - - भाग - ६
- नशीब माझे - - भाग - ७
- नशीब माझे - - भाग - ८
- नशीब माझे - - भाग - ९
- नशीब माझे - भाग - १०
- नशीब माझे - भाग - ११
- नशीब माझे - भाग - १२
- नशीब माझे - भाग - १३
- नशीब त्यांचे - भेटू भाग १४
- नशीब त्यांचे - भेटू भाग १५
- नशीब त्यांचे - भाग १६
- नशीब त्यांचे - भाग १७
- नशीब त्यांचे - भाग १८
- नशीब त्यांचे - भाग १९
- नशीब त्यांचे - भाग २०
- नशीब त्यांचे - भाग २१
- नशीब त्यांचे - भाग २२
- नशीब त्यांचे - भाग २३
- नशीब त्यांचे - भाग २४
- नशीब त्यांचे - भेटू भाग - २५
- नशीब त्यांचे - भाग २६
- नशीब त्यांचे - भाग २७
- नशीब त्यांचे - भाग २८
- नशीब त्यांचे - भाग २९
- नशीब त्यांचे - भाग ३०
- नशीब त्यांचे - भाग ३१
- नशीब त्यांचे - भाग ३२
- नशीब त्यांचे - भाग ३३
- नशीब हे शिकलो - भाग ३४
- नशीब हे शिकलो - भाग ३५
- नशीब हे शिकलो - भाग ३६
- नशीब हे शिकलो - भाग ३७
- नशीब हे शिकलो - भाग ३८
- नशीब हे शिकलो - भाग ३९
- नशीब हे शिकलो - भाग ४०
- नशीब हे शिकलो - भाग ४१
- नशीब हे शिकलो - भाग ४२
- नशीब हे शिकलो - भाग ४३
- नशीब हे शिकलो - भाग ४४
- नशीब हे शिकलो - भाग ४५
- नशीब हे शिकलो - भाग ४६
- नशीब हे शिकलो - भाग ४७
- नशीब हे शिकलो - ४८
- नशीब हे शिकलो - ४९
- नशीब हे शिकलो - ५०
- नशीब हे शिकलो - ५१
- नशीब भाग - ५२
- नशीब भाग - ५३
- नशीब भाग - ५४
- नशीब भाग - ५५
- नशीब भाग - ५६
- नशीब भाग - ५७
बॅंकेत नोकरी होती म्हणून एकाने मुलगी दाखवण्याचा कार्यक्रम जुळवून आणला होता. मी तर फक्त एसेस्सी होतो. ति वाणिज्य विषयात दुसर्या वर्षाला महाविद्यालयात शिकत होती. त्याचे मला कौतुक मुळीच नव्हते, मला शिकवलेल्या पेक्षा शिकलेली व्यक्ती जास्त मोलाची होती. जमलेल्या मंडळींनी माझे शिक्षण, पगार, राहती जागा वगैरे प्रश्न विचारले व त्यावर विनोद सुरू होते. त्यांच्या विनोदात सहभागी होत मी पण विचारले होते, माहिती जीला लग्न करायचे होते तिच्या करता होती की माझे "माप" काढण्याचा प्रकार होता. मी जमलेल्यांना बाहेर जाण्याची विनंती केली होती, मुलीला एकटी बसवून विचारले होते, " आईबाबांच्या दबावा मुळे इथे आहेस की तुला मनापासून जोडीदार शोधावा आणि त्याच्या बरोबरीने पुढील वाटचाल करावी असे ठरवले आहेस ?" तिने एका तुटक वाक्यात सांगून टाकले होते, "आईबाबांच्या दबावा मुळे."
मी तिच्या समोर कोपरापासून हात जोडत तिचे आभार मानले होते. बाहेर जाऊन जमलेल्यांना स्पष्ट सांगितले होते " अहो तुमच्या मुलीला लग्न म्हणजे काय ह्याची माहिती द्या, त्यातच तुमचे आणि तिचे भले होईल." नशीब त्यांचे मी त्यांना फसवले नव्हते. असेच काहीसे बर्याच वेळा घडले. योगायोग बघा आज माझ्या मोठ्या मुलाच्या बाबतीत त्याचीच पुनरावृत्ती होते आहे. वडिलधारी मंडळी बाजारात कांदेबटाटे निवड करण्यासारखे प्रश्न विचारीत येतात व न बोलता दुसर्या दुकानात शोधायला निघून जातात. मुलाला कोण साथी मिळणार ह्याची उत्सुकता अजून कायम आहे.
असो, बॅंकेची नोकरी सोडून एका कंपनीत गेलो १९७६. प्रथम वयस्क मालकाशी बोलणी झाली. त्याचे प्रश्न विचारणे संपल्यावर मी प्रश्न विचारण्याची परवानगी मागितली, त्याने दिली. मी विचारले होते १ - त्या कंपनीत कामगारांची उलाढाल कशामुळे, किती असते ? २ - मला काम देण्या इतके काम आहे का ? ३ - दिलेल्या वेळेच्या आंत काम पूर्ण केल्यास दुसरे काम माझ्या करता मिळे पर्यंतच्या वेळात मी कामा संबंधीचे वाचन करू शकतो का ? तो थोडा वेळ माझ्या कडे बघत बसला होता. आजपर्यंत असे प्रश्न त्याला कोणी विचारले नव्हते. त्याने योग्य ती उत्तरे देण्याचा प्रयत्न केला होता. त्याला एका प्रश्नाचे माझे खरे उत्तर ऐकायचे होते. मी असे प्रश्न विचारण्याचे धाडस का केले होते. "मी पगार देणार्या मालकाचा नोकर नाही. माझ्या कामाचा योग्य मोबदला मिळवणे एवढेच नाते आणि उद्देश." माझ्या उत्तराचे त्याला कौतुक वाटले होते.
जेवढा पगार देणे त्याला शक्य होते तेवढेच काम त्याने मला देण्याची व्यवस्था केली. जेव्हा माझ्या कामात कोणी ढवळाढवळ केली, तेव्हा त्याने पुढे येऊन मदत केली होती. इतरांच्या कामाची ओळख करून घेणे माझा छंद होता त्यामुळे एकदा एका मोठ्या प्रकल्पाला दोष सूचक गजर (फॉल्ट आलार्म ) जरुर भासली, मी ते साधन काही तासात, दुसर्या कामात वापरात असलेल्या भागांची जुळणी करून बनवून दिले, पुढे एक अधिक सोय म्हणून ते साधन प्रत्येक मशीनाला अविभाज्य भाग म्हणून जोडण्यात आले.
दुसरा मोठा प्रकल्प काही कारणा करता रेंगाळला होता. सगळी यंत्र साधने वेगवेळी केली की अपेक्षीत काम करीत होते. परंतु एकत्र जोडली की काम थांबायचे. जुळणी विभाग प्रमुखाने दोष माझा असल्याचे मालकाला सांगितले होते. दूरवर पसरलेल्या हजार बाराशे तारांचा शोध व जुळणी आमच्या तिथल्या गुरख्याच्या मदतीने मी पूर्ण केली होती. त्या करता मी दोन बारके विजेचे दिवे वापरले होते. एक दिवा माझ्या हातात होता दुसरा त्या गुरख्याच्या हातात होता. तारांच्या संचाच्या (४१ तारांचे आरमर्ड केबल) क्रमांकानुसार संचाच्या कवचाला दिव्याची तार जोडून दिव्याची दुसरी तार मी संचातील एका तारेला जोडायचो त्यावर नकाश्यात दाखवलेला क्रमांक चढवायचो. तिकडे तो गुरखा तसेच करीत असे. दिवा लागला की एक क्षण थांबायचे मग त्याने तीन वेळा दिवा चालूबंद करायचा, ह्याचा अर्थ हवी असलेली तार सापडली. मी दोन दिवसात ते काम पूर्ण केले होते.
प्रकल्प रेंगाळल्यामुळे कंपनीला दर दिवशी हिशोबाने खूप मोठे नुकसान सोसावे लागत होते. मी, मालक, जुळणी विभाग प्रमुख व प्रकल्पाचा नकाशा बनवणारा मुख्य अधिकारी सगळे एकत्र जमलो, मला तारांचा शोध कसा घेतला ह्याचे प्रात्यक्षिक दाखवावे लागले. काम तंतोतंत असल्याची कबुली प्रत्येकाला द्यावी लागली. मग दोष कसा शोधणार ह्यावर वादावादी सुरू झाली. मी मालकाची माफी मागितं सांगितले, मी इंजिनिअर नाही पण अनुभवी आहे. नियंत्रण तारसंच व माहिती शोधक तारसंच नकाश्यात दाखवल्याप्रमाणे एकत्र बांधले होते, ते वेगळे करून दोन्ही तारसंचातील अंतर जास्त वाढवल्यास हा दोष काढता येईल असे सुचवले. त्या प्रमाणे एका यंत्र साधनावर प्रयोग झाला. अपेक्षित कार्य सुरू झाले. माझे तोंड भरून कौतुक झाले. पण एक पैसा बक्षीस किंवा पगार वाढ झाली नाही. दोषारोप, भांडणे झाली. मी नोकरी सोडली. पण एक चांगली संधी मिळाली. माझा आत्मविश्वास वाढला. शेवटी - नशीब त्यांचे - भेटू भाग १५