वाटेल ते खा! वजन मर्यादेत राखा!

वाढत्या वया बरोबर नाना व्याधी सोबत करत राहतात. वजन कमी करणे भाग असते. कधी डॉक्टर सांगतात, मीठ खाऊ नका! कधी गोडावर बंधने येतात. कुणाला तेल-तूप खाण्याला मनाई असते. हे सारे त्या त्या व्यक्तीच्या आरोग्यासाठी, त्याच्या हितासाठीच असते यात शंका नाही.

पण जीभेची भूक स्वस्थ बसू देत नाही. संयमी राहा, हे म्हणणे सोपे; कृती अवघड!

मला एक युक्ती सापडली आहे. तशी ती सर्वमान्य होणे कठीण! पण पाहा भावते का!

आपण डॉटरांनी मना केल्यानंतरदेखील चकली खातो ती जीभेचे चोचले पुरवण्यासाठी! शरीराला ती हवी म्हणून नव्हे. मग चकलीचा तुकडा तोंडात टाका; चघळा; मनसोक्त आनंद लुटा! पण ती पोटात जाऊ देऊ नका! तस्तात तोंड रिकामे करा! अशा तऱ्हेने कितीही चकल्या खाल्ल्या तरी अपाय नाही आणि रसनेचे चोचले देखील पुरवले गेले!

फक्त हे करताना एकांत हवा! इतरांना हे करणे आवडत नाही. त्यांना किळस वाटते. त्यांच्या भावनांचा आदर करायला हवा ना?

मग काय पक्वान्ने झोडायला परवानगी ना?