रोजच्या कामातले गडबडघोटाळे

'मेलं एक काम सुधं होत नाही. लाइफच गंडलंय.' ही वाक्य कधीकधी तोंडी येतं. बऱ्याचदा रोजच्या व्यवहारातल्या अगदी साध्या कामांत विचारात असल्याने किंवा घाईत असल्याने आपल्याकडून काही मजेदार,काही विचीत्र गडबडघोटाळे घडतात. माझ्या आयुष्यातले हे काहीः


१. काचेच्या बरणीचे झाकण सैल असताना बरणी उचलल्याने झाकण हातात राहून बरणीने खाली लोटांगण घेणे.
२. घाईत दाबल्यावर पावडरच्या डब्यातून भसकन पाच माणसांना लावण्याइतकी पावडर हातावर पडणे.
३. गाऊनच्या खिशातल्या भ्रमणसंचाने मी कपडे भिजवायला वाकल्यावर त्या साबणाच्या पाण्यात आत्महत्या करणे.
४. दूध उतू जाणे.
५. साखरेचा डबा जोरात उघडून साखर अंगावर सांडणे.
७. तेलाच्या पिशवीतून डब्यात तेल काढताना पिशवीला कात्री लावल्यावर हवेच्या दाबाने पिशवी वेडीवाकडी होऊन तेल सांडणे.
८. प्रवासात प्रसाधनाच्या घाईत हाताला क्रिम ऐवजी पिशवीतून हाताला लागलेली टूथपेस्ट लावणे.
९. हातातील गरम भांडे टेबलावर नेत असताना चिमटा फिरुन भांड्यातील पादार्थ सांडणे.
१०. कपडे वाळत घालायच्या उंच दांडीवर कपडा टाकल्यास तो दुसऱ्या बाजूने खाली पडणे.
११. परिश्रमपूर्वक धुवून नीळ घाललेल्या पांढऱ्याशुभ्र कपड्यावर चिमणीने पातर्विधी करणे.
१२. खण लावताना त्यात बोट चेमटणे.
१३. गॅसवर दूध व दुसऱ्या गॅसवर चहा उकळत असताना चुकून दुधात चहापावडर घालणे.
१४. कपडा सकाळी सकाळी तयार होताना अंगात उलटा घालणे.
१५. पातळ कपडा तापलेल्या इस्त्रीला चिकटून त्याचा टवका निघून येणे.
१६. खात असलेल्या आंब्याची कोय हातातून निसटून अंगात घातलेल्या पांढऱ्या कपड्यावर पडणे.
१७. लाकडी टाचेच्या चपला घालून कचेरीतील फरशीवरुन घसरणे.
१८. इ-पत्र घाईत ऍटॅचमेंट न पाठवताच नुसते 'सदर कागदपत्र ऍटॅच करुन पाठवत आहे' अशा मजकूराचे रिकामे पत्र पाठवणे.
१९. पाठकोऱ्या कागदावर मुद्रण करताना तो चुकीचा ठेवल्याने आधी मुद्रीत केलेल्या बाजूवरच परत मुद्रण होणे. 


तुमचे गडबडघोटाळे ऐकवा ना हो आम्हाला!