नशीब माझे - भाग - १०

आज पर्यंत मला प्रेम ह्या शब्दाचा अर्थ समजलाच नाही. प्रेम मी कधी अनुभवले नाही. जे काही बघितले, अनुभवले ते सगळे त्या प्रसंगानुसार एक तडजोड, कर्तव्य, असहायता असेच काहीसे होते. मी मित्र कधीच जोडले नाही कदाचित हा दोष माझाच असावा, मला मित्र जमविण्याची कला असते हेच माहीत नसावे हेच मान्य करणे बरे.

मुली हा प्रकार मला वयाच्या १८ वर्षा पर्यंत नीटसा समजलाच नव्हता. ह्याचे कारण वयाच्या ८ - १० वर्षाचा असताना एका खेळातून एका ६ - ७ वर्षाने मोठी असणार्‍या मुलीने मला त्या वयाला न शोभणार्‍या ( कदाचित शोभणार्‍या ) गोष्टी शिकवायला सुरू केले होते. संसारी स्त्री-पुरुषांचे व काही मुला मुलींचे भर दिवसा चोरी छुपे चालणारे अनैतिक संबंध तिनेच मला फार जवळून दाखवले. ते जे काही मी केले बघितले हे चुकीचे अनैतिक होते हे मला लाथाबुक्के, काठीचा मार बसला तेव्हा समजले. अनैतिक संबंध वाल्यांना कोणी पकडले नाही. दोष माझाच असावा म्हणून मी पकडलो गेलो.

त्या नंतर मी कधी कोणाला भेटण्याचा बोलण्याचा प्रयत्न केला नाही. समवयस्क मुले मुली तासनतास बोलत बसलेली पाहून मला आजही आच्श्रर्य वाटते. ज्या मुली लहान सहानं कामानिमित्त संपर्कात आल्या त्या वयाने माझ्या पेक्षा मोठ्या होत्या. अशाच कामातून एका समवयस्क मुली बरोबर माझ्या भेटी वाढू लागल्या. तीच्या घरी मी रोज जात असे. अधून मधून ती शरीर संबंधाचा विषय काढीत असे. मी माझा मार खाण्या पर्यंतचा अनुभव तिला सांगितला. तिने मला बावळट ठरवले व आम्ही दोघे वेगवेगळ्या कारणा करिता हसलो.

एकदा तिने मला त्यांची झोपण्याची जागा दाखवली. एक मोठा व तीन छोटे पलंग चार भिंतींना टेकून मांडलेले होते. आम्ही बाहेर जाऊन झाडा खाली बसलो. तिने बघितलेले व अनुभवलेले, त्या झोपेच्या जागेतील प्रसंगांचे वर्णन मला ऐकवले. तसे ते प्रसंग मला नवीन नव्हते, नावीन्यं होते ते तिच्याच घरातील नातेवाईकांचे आप्ताचे. सगळ्यात हटके वेगळे घडले ते असे की तिच्याच आईने आम्हा दोघांना, सावध करण्याकरिता सांगितलेले आजूबाजूच्या मंडळींचे " अफेअरस ". तेव्हा पासून मला नैतिक - अनैतिक संबंधांना अफेअरस म्हणतात हे समजले. कोण किती नैतिक - अनैतिक म्हणून मिरवून घेतो त्यानुसार नैतिकता - अनैतिकता ठरवली जाते हे पण समजले. " एक्स्टर्नल, इंटर्नल व फॉरिन अफेअरस " म्हणजे खर्‍या अर्थाने प्रत्यक्षात काय ? हे माझ्या सारख्या समस्त रक्तदोषित विचार करणार्‍यांना सहज समजू शकेल.  

अहो त्या मुलीने मला फार मोठा धक्का दिला. हि मी करून घेतलेली समजूत. माझ्या घरी कधीही न आलेली त्या दिवशी भर उन्हात सायकल वरून माझ्या घरी आली होती. तिला माझ्याशी लग्न करायचे होते. मी लग्नाचा विचार करणे शक्यच नव्हते. तीच्या घरातून तिला विरोध होता. लग्नाआधी आई झाली की मान्यता मिळेल म्हणून तिचा तो प्रयत्न होता. मी घाबरलो होतो. मला लग्नाआधी बाप व्हायचे नव्हते. तिला मी नकार दिला. काही दिवसातच ते " अफेअर " संपले. जे काही घडले हे नैतिक - अनैतिक ठरवणार कोण ? शेवटी - नशीब माझे - भेटू भाग ११