ह्यासोबत
- नशीब माझे ......भाग - १
- नशीब माझे . . . . भाग २
- नशीब - - माझे - - ३
- नशीब माझे - - भाग - - ४
- नशीब माझे - - भाग - ५
- नशीब माझे - - भाग - ६
- नशीब माझे - - भाग - ७
- नशीब माझे - - भाग - ८
- नशीब माझे - - भाग - ९
- नशीब माझे - भाग - १०
- नशीब माझे - भाग - ११
- नशीब माझे - भाग - १२
- नशीब माझे - भाग - १३
- नशीब त्यांचे - भेटू भाग १४
- नशीब त्यांचे - भेटू भाग १५
- नशीब त्यांचे - भाग १६
- नशीब त्यांचे - भाग १७
- नशीब त्यांचे - भाग १८
- नशीब त्यांचे - भाग १९
- नशीब त्यांचे - भाग २०
- नशीब त्यांचे - भाग २१
- नशीब त्यांचे - भाग २२
- नशीब त्यांचे - भाग २३
- नशीब त्यांचे - भाग २४
- नशीब त्यांचे - भेटू भाग - २५
- नशीब त्यांचे - भाग २६
- नशीब त्यांचे - भाग २७
- नशीब त्यांचे - भाग २८
- नशीब त्यांचे - भाग २९
- नशीब त्यांचे - भाग ३०
- नशीब त्यांचे - भाग ३१
- नशीब त्यांचे - भाग ३२
- नशीब त्यांचे - भाग ३३
- नशीब हे शिकलो - भाग ३४
- नशीब हे शिकलो - भाग ३५
- नशीब हे शिकलो - भाग ३६
- नशीब हे शिकलो - भाग ३७
- नशीब हे शिकलो - भाग ३८
- नशीब हे शिकलो - भाग ३९
- नशीब हे शिकलो - भाग ४०
- नशीब हे शिकलो - भाग ४१
- नशीब हे शिकलो - भाग ४२
- नशीब हे शिकलो - भाग ४३
- नशीब हे शिकलो - भाग ४४
- नशीब हे शिकलो - भाग ४५
- नशीब हे शिकलो - भाग ४६
- नशीब हे शिकलो - भाग ४७
- नशीब हे शिकलो - ४८
- नशीब हे शिकलो - ४९
- नशीब हे शिकलो - ५०
- नशीब हे शिकलो - ५१
- नशीब भाग - ५२
- नशीब भाग - ५३
- नशीब भाग - ५४
- नशीब भाग - ५५
- नशीब भाग - ५६
- नशीब भाग - ५७
दुपारचे बॅन्कॉक स्वागतकक्ष आणि रात्रीचे मुंबई स्वागतकक्ष हा वातावरण बदल, " मंमईच्या इमान तळाचा द्येखावा बघायला आलेल्या गावाकडच्या बाळ्याला गावच्या यष्टी स्टॅन्डचा बदल " जसा जाणवेल तसाच मला जाणवला. आम्ही दोघे तास भर रांगेत उभे होतो का तर विमानातून उतरल्याच्या पत्रकात ( डिसएम्बारकेशन कार्ड ) माहिती लिहिण्याचे प्रवाशांचे काम अधिकारी वर्ग करीत होता. माझ्या पासपोर्टवर शिक्का झाला, बायको परदेशिय पासपोर्ट रांगेत होती. आधिकार्याने तिला प्रवेश नाकारताच ति खालीच कोसळली. एकतर गर्भवती बाई. प्रवासाचा थकवा त्यात दोन पायावर तास भर उभे राहणे आणि वरून प्रवेश नाकारला, मग
काय पळापळ झाली. आम्हा दोघांना मुख्य आधिकार्याच्या कार्यालयात बसवले गेले, बर्याच वेळाने तो अधिकारी आला, सुदैवाने मराठी मानूस होता. " त्याचे काय आहे तुमच्या बायकोच्या प्रवास पर्वान्यात एकदाच प्रवेश आहे, तो एकदा सहा दिवसा पूर्वी झाला, आता दुसरा प्रवेश आम्ही देऊ शकत नाही. बरं एक सांगा ही तुमचीच बायकोना, नाही म्हणजे काही भानगड नाही ना ?
वाचकहो तुमची काय प्रतिक्रिया असेल मला माहीत नाही, पण त्या क्षणाला चाफेकर बंधूंची रॅन्ड साहेबाला गोळी घालण्याची मनस्थिती मी समजलो. पण मग ते छोटे बाळ, आम्हा दोघांचा तो योजनाबद्ध कार्यक्रम आठवला. "अडला नारायण गाढवाचे पाय धरी " हे पण आठवले. ति शुक्रवारची रात्र होती, शनिवार, रविवार, सोमवार सकाळ मला फलटण रोड पोलीस ठाण्यात जाऊन परत यायचे, तो पर्यंत बायकोला विमान तळावर . . . छे छे शक्यच नव्हते. चार दिवसापूर्वीच्या हॉन्गकॉन्ग प्रसंगाची पुनरावृत्ती . . नको, बायकोला हा धक्का सहन होणार नव्हता. इराण मधल्या भारतीय दूतावासाच्या लग्न नोंदणीची पत्र प्रत साहेबाच्या हातात दिली, त्या साहेबा बरोबर जरा चाय पाण्याच्या गोष्टी केल्या, त्या काळात चाय पाणी स्वस्त होते, आजकाल इन्फ्लेशनच्या जमान्यात चाय पाण्याची पण भाव वाढ झाली आहे. तर, टेबलाचा खण उघडला गेला आणि बायकोला प्रवेश परवाना मिळाला.
१० दिवस हसण्या-रडण्यात निघून गेले, मी हमाल होणार अशी दगडावरची काळी रेघ काढलेल्या मंडळींना, हमालाच्या तुलनेत कैक पटीने जास्त वैभव मी जमवल्याचे अंजन का मंजन त्या मंडळींच्या डोळ्या करता भेट देण्याचा थोडा फार आनंद मी मिळवला. बॅन्कॉक ला ग्रहण केलेली चित्र रिळे छपाईला दिली, कॅनन प्रतिमा ग्राहकाचा दर्जा बघण्यास उत्सुक होतो. बरेच काही प्रयोग केले होते. छापील चित्र व कुतूहल वाढवलेले पारदर्शि चित्र ( प्रिंटेड फोटो, ट्रान्सपेरन्सी ) ह्यातील फरक माझ्याच कामातून शोधायचा होता, तो मला सापडला, त्याचा आनंद मला मोलाचा होता. मुंबई पुण्यात थोडे चित्र ग्रहणाचे प्रयोग केले.
इराण मधली परिस्थिती समजून मुलाचा जन्म भारतात व्हावा असा आमचा प्रयत्न होतो, सर्व प्रकारची काळजी माझे अगदी जवळचे नातेवाईक मंडळी घेतील असे आश्वासन घेऊनच मी बायकोला भारतात आणले होते. परंतु पाल चुकचुकली व नातेवाईकांनी रंग बदलले, मी सगळ्या खर्चाचा हिशेब केला तेवढे पैसे त्यांना देण्या करता तयार ठेवले, बाळ इराणला जन्माला येण्याने काय नुकसान होण्याची शक्यता होती हे सुध्दा समजवून सांगण्याचा अयशस्वी प्रयत्न केला, पण नाही, आमच्या व बाळाच्या नशिबी जन्म स्थान इराणच होते. जे होईल ते भोगायचे असे ठरवून एके दिवशी तेहरानला परतलो. आम्हा दोघांना बाळाचे वेध लागले
होते.
क्रांतिकारकांचा राग परदेशी पासपोर्ट धारकां विरुद्ध वाढू लागला. माझी पेकान गाडी विकण्याचा सल्ला प्रत्येकाने दिला. मी गाडी ३५००० ला विकली. महिन्या भरात इराण - इराक युद्ध सुरू झाले. सगळ्या वस्तूंच्या किमती ५ पटीने वाढल्या होत्या. १९८१ बाळाचा जन्म झाला. बायकोला दवाखान्यात ने आण करण्यात इराणी मित्रांनी खूपच मदत केली होती. पहिला मुलगा सगळ्यांनाच आनंदाचा क्षण होता. पहिल्या दिवशी दर तासाला ३६ चित्रांचे १ चित्र रीळ संपवले होते. मात्र १० व्या दिवशी एका प्रसंगाने आम्हा सगळ्यांनाच कधीही न विसरणारा धक्का दिला होता. मी कंपनीत कामाला गेलो होतो. सकाळच्या वेळात बायकोने मुलाला दूध पाजले व तसेच खाली ठेवले आणि मुलाने डोळे फिरवले, जोरात ओरडा सुरू झाला, तोपर्यं मुलाचा चेहरा निळा झाला होता. त्याचा श्वास थांबला होता. बायकोच्या भावाने डोके वापरून मुलाच्या तोंडातून जोरात हवा भरली आणि पाय धरून उलटे केले, सगळे दूध बाहेर आले आणि श्वास सुरू केला होता. दवाखाना जवळच असल्याने डॉक्टर कडे नेले. तो पर्यंत मुलगा अगदी सामान्य झाला होता. मग माझ्या डॉक्टर मित्राने बायकोला दम भरला, दूध बसून पाजायचे, दूध पिणे संपल्यावर मुलाच्या पाठीवरून दाब देऊन हात फिरवायचा, ढेकर आल्यावर थोडा वेळ उभे ठेवायचे, मग खाली आडवे ठेवायचे म्हणजे दूध असे घशात अडकणार नाही.
एके दिवशी सीडनी ऑस्ट्रेलीयात राहणार्या भावाचे पत्र आले, " इराणच्या विचित्र परिस्थितीत न राहता ऑस्ट्रेलीयात ये, इथे तुझ्या कलेचे सोने होईल. सोबत आमंत्रण पत्र देत आहे ते दाखवून तुला प्रवास परवाना लवकर मिळेल. मी आईला तयारी करायला सांगितले आहे, येताना तिला घेऊन ये." तो प्रवास - वाचा भाग - ३३