मी पाहिलंय त्याला....

आरती कदम

paahile
मी पाहिलंय त्याला....
पानांशी खेळताना
फुलांशी बोलताना
तासन् तास झाडांबरोबर
मनमुराद गप्पा मारताना
मी पाहिलंय त्याला....
लहानांबरोबर बागडताना
मोठ्यांची खोडी काढताना
प्रत्येकाशी अगदी त्याच्या
वयाप्रमाणे वागताना
मी पाहिलंय त्याला....
भटकंती करणार्‍यांची
मने फुलवताना
प्रेमी युगुलांची भेट
मोहरून टाकताना
मी पाहिलंय त्याला....
त्याच्या सखीवर प्रेम करताना
तिला मिठीत घेताना
थोड्याच दिवसांची भेट म्हणून
तिचे लावण्य खुलवताना
मी पाहिलंय त्याला...
आपल्यावर नेहमी
प्रेमाचा वर्षाव करताना
चुका दाखविण्यासाठी आपल्या
भीषण रूप धारण करताना

मी पाहिलंय त्याला...
प्रत्येकाच्या मनात आपली
वेगळी जागा बनवताना
'पाऊस' म्हटलं की त्याच्या
आठवणी मनामनातून झरताना...
मी पाहिलंय त्याला...!

paNatee