कॉर्न चाट
जिन्नस :
कॅनोपीज (लहान आकाराच्या बास्केट असतात. ज्या चाटसाठी मुख्यत्वे वापरतात) - १ बॉक्स
उकडलेले स्वीटकॉर्न - १ कप
उकडलेले मध्यम आकाराचे बटाटे - २
मध्यम जाड शेव
चाट मसाला
चिंचेची गोड चटणी
कांदा - १ (बारीक चिरून)
कोथिंबीर - मूठभर
क्रमवार मार्गदर्शन :
आधी कॅनोपीज हलक्या गुलाबी रंगावर तळून घ्याव्या. पेपर टॉवेलवर निथळा. मग एकेका बास्केटमध्ये थोडे उकडलेले स्वीटकॉर्न, थोडा बटाटा, कांदा, शेव, चाट मसाला, कोथिंबीर आणि शेवटी चिंचेची चटणी भरा. झाले कॉर्न चाट तयार!