काल अवकाळी कशा पडल्या सरी

अदिती

saree
काल अवकाळी कशा पडल्या सरी
वादळे भेटायला आली घरी

निर्णयाला संमती घेऊन जा
मान्य हे सारे मला नसले जरी

तू मला अन् मी तुला सांभाळले
गाठली नाही सुखाची पंढरी

सोसवेना मौन हे माझे मला
तूच आता बोल रे कवितेपरी

खर्चले हे ताव अन् शाई किती
प्रेम नाही आपले अल्पाक्षरी

paNatee