पाहिले होते

स्नेहदर्शन

pahile

मी स्वतःला झुंजताना पाहिले होते
दैव माझे हारताना पाहिले होते

तडफडे मासा जसा हे मन तसे माझे
मरण तेव्हा मागताना पाहिले होते

आठवावे लागते आता मला मागे
मी कधी मज हासताना पाहिले होते

वाटली जेव्हा मला ही माणसे माझी,
रंग त्यांचे बदलताना पाहिले होते

मी कुठे होतो कुणाचा ना कुणी माझे
मी मला कवटाळताना पाहिले होते

paNatee