भोवरे
मी दूर होतो, हे खरे
पण वाचले मी चेहरे
निद्रिस्त का झाली घरे
करुनी नभांची छप्परे
घरट्यात ना उरले कुणी
गेली, उडाली पाखरे...
मी उघडली दारे तरी
पक्ष्यांस प्रिय हे पिंजरे!
टिकणार का होती कधी
वाळूतली ही अक्षरे?
वाहून ने तू जीवना -
हे खूप झाले भोवरे...