जीवना तुझियाबरोबर चालताना

स्नेहदर्शन

जीवना तुझिया बरोबर चालताना
हार नाही मानली मी हारताना

कोणत्या वस्तीत मी आलो उगाचच
चेहरा माझा विसरलो,पाहताना

जाळतो इतिहास माझा रोज हल्ली
रोज का दिसते मला ती हासताना

सांग ना विश्वास म्हणजे काय असते?
का नदी बघते मुलांना वाहताना ?

वेदनेशी भेट होती नेहमीची
पाहिले, बस, हास्य माझे चाळताना

paNatee