मराठी माणसाने उद्योजक होण्यासाठी कोणती पाऊले टाकावीत?

मराठी माणसाने उद्योजक होण्यासाठी कोणते गुण आवश्यक आहे? आपल्या न्युनगंडावर कशी मात करावी?

आतापर्यंतच्या अनुभवानंतर सर्वसाधारणपणे माझ्या दृष्टीस पडलेले चित्र असे "Boss" गुजराती, बहुतांशी "Employees" मराठी.

मराठी माणसांमध्ये कामाप्रती निष्ठा, कौशल्य, चौकस वृत्ती, कल्पनाशक्ती, जबाबदारीची जाणीव, तडजोडवृत्ती इतरांच्या तुलनेत जास्त असते. एवढे सर्व गुण असुनही मराठी माणुस मागे का? हा प्रश्न छळतोच. कित्येक नावाजलेल्या कंपन्यामध्ये, संस्थामध्ये महत्वाच्या पदांवर मराठी माणसे आहेत पण उद्योजगतेमध्ये हा आकडा हाताच्या बोटावर मोजण्याइतकाच.

मला या चर्चासत्रात फक्त कारणांची मीमांसा (मालिका) नको तर काही ठोस उपाय, सुचना, मत, सल्ले हवे आहेत.
तुम्हां सर्वांना उद्योजकतेसाठी आवश्यक गुण, एखादी कला किंवा प्रशिक्षण गरजेचे वाटत असेल तर त्याची माहीती द्यावी.
मराठी उद्योजकांची व त्याच्या कार्यक्षेत्राची थोडक्यात माहीती दिल्यास उत्तम.

आधुनिक जगात नव्याने निर्माण झालेली औद्योगीक क्षेत्रे, संधी, आपल्या मराठी माणसांची बलस्थाने, मर्मस्थाने यावर सारासार विचार करून मराठी माणसाने उद्योजक होण्यासाठी कोणती पाऊले टाकावीत? याचे उत्तर अपेक्षीत आहे.

तुम्हां सर्व मनोगतीच्या अभिप्रायाची, सहकार्याची अपेक्षा.

धन्यवाद,  जय महाराष्ट्र...!!