रुढींमागे दडलंय काय?

वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या रुढीपरंपरा आपल्याला बघायला मिळतात. 'हे असं कर.' ' ते तसं करू नको.' ' असं केल्याने असं होतं.' वगैरे प्रकार बघायला मिळतात. काहीच अर्थबोध होत नाही कधीकधी त्या गोष्टींचा, रुढींचा आणि खरंच या रुढी इतक्या कशा काय टिकल्या, वर्षानुवर्षे चालू राहिल्या, अशाच पुढे चालू ठेवायच्या का, काही अर्थ आहे का त्यांच्यामागे दडलेला असे अनंत प्रश्न मनात उभे रहातात. याची उत्तरे शोधायचा प्रयत्न करूया का?

एखादी कृती का अस्तित्वात आली / आणली गेली असावी, ती रुढी का बनली असावी, ती आजही तशीच चालू ठेवण्यात कितपत तथ्य आहे किंवा सद्ध्याची परिस्थिती बघता त्यात काय बदल करून नविन पद्धत अंगिकारण्यात शहाणपणा आहे असा उहापोह अपेक्षित आहे.  

कोणाच्याही भावना दुखवण्याचा हेतू नाही तर वैज्ञानिक दृष्टीने आपली संस्कृती बघण्याचा हा एक छोटा प्रयत्न आहे. या प्रयत्नात आपल्या सर्वांची मदत अपेक्षित आहे. करूया का मग सुरुवात?