साडीची शान

  श्री. शशी थरूर भारतात आले असता सर्वत्र महिलांचे  साडी नेसण्याचे प्रमाण कमी झाल्याचे पाहून Times of India मध्ये लेख लिहून त्याविषयी त्यानी हळहळ व्यक्त केली,कारण त्यांच्या मते साडी हे स्त्रियांचे सर्वोत्कृष्ट वस्त्र आहे.त्यात कोणत्याही प्रकारची स्त्री आकर्षकच दिसते साडीत तिची (स्त्रीची ) वैगुण्ये लपवण्याची मोठी क्षमता असते.पण असा लेख लिहिल्याचा  श्री थरूर याना चांगलाच मनस्ताप झाला‌. समस्त महिलावर्गाने त्यांच्यावर मिळेल त्या मार्गाने (ई-मेल,वगैरे)जवळजवळ हल्लाच केला आणि तो एवढा तीव्र की त्याना पुढच्याच आठवड्याच्या (८ एप्रिलच्या) Times of India मध्ये पुन्हा लेख लिहून महिलावर्गाची माफी मागावी लागली  हल्लेखोर महिला वर्गाचा आक्षेप दोन कारणानी होता.पहिले कारण आजच्या धावपळीच्या जीवनात महिलांना जीन्स, शर्ट, सलवार ,कुर्ता याप्रकारचे कपडे वापरणे सोयीचे जाते त्यामुळे त्या साडी वापरत नाहीत‌ . शिवाय त्यांच्या मते श्री.थरूर यांचा हा पुरुषी दृग्टीकोण आहे .त्यानी पुरुषानी धोतर किंवा लुंगी आणि कुर्ता यांचा वापर सोडल्याचे दु: ख व्यक्त करून त्यांना ते वापरण्याचा उपदेश का केला नाही असा प्रश्न या महिलानी उपस्थित केला ‌स्वत: श्री.थरूरसुद्धा सूट बूटच वापरतात यावरही काही महिलानी टीका केली.   फक्त काही महिलानीच श्री थरूर यांच्याशी सहमती व्यक्त करत आपल्या साड्यांवरची धूळ झटकल्याचे सांगितले.मनोगती महिलांचे याबाबतीत काय म्हणणे आहे ?