पाकप्रश्न

हा धागा पाककृतींच्या फर्माइशीसाठी, एखादा पदार्थ बिघडत असेल तर सल्ला विचारण्यासाठी, किंवा एकंदरित स्वयंपाकघरातील प्रश्नांसाठी वापरावा. प्रश्नांची उदाहरणे:



  • मी हा पदार्थ कसा करू? इथे अमूक, तमुक मिळते. तमके आणि अमके मिळत नाही!

  • इथे भरपूर टॉमेटो आले आहेत. त्याच्या पाककृती सुचवा.

  • दुपारी डब्यात नेण्यासाठी ३० मिनिटात होतील अशा पाककृती सुचवा.

  • मी श्रीखंड करायचा प्रयत्न केला ते बासुंदीसारखे पातळ झाले आहे. आता काय करू?

  • वगैरे ... ;-)

उत्तरे देताना, नवीन पाककृती या दुव्यावरून द्यावी. त्या पाककृतीचा दुवा प्रतिसादात द्यावा. जास्तीच्या टीपा एकतर पाककृतीत किंवा प्रतिसादात देता येतील. काही पाककृती आधीच दिलेल्या असतील तर त्यांचा दुवा द्यावा.


अधिक माहिती: भाष यांची दुवादान पद्धत