ह्यासोबत
- नशीब माझे ......भाग - १
- नशीब माझे . . . . भाग २
- नशीब - - माझे - - ३
- नशीब माझे - - भाग - - ४
- नशीब माझे - - भाग - ५
- नशीब माझे - - भाग - ६
- नशीब माझे - - भाग - ७
- नशीब माझे - - भाग - ८
- नशीब माझे - - भाग - ९
- नशीब माझे - भाग - १०
- नशीब माझे - भाग - ११
- नशीब माझे - भाग - १२
- नशीब माझे - भाग - १३
- नशीब त्यांचे - भेटू भाग १४
- नशीब त्यांचे - भेटू भाग १५
- नशीब त्यांचे - भाग १६
- नशीब त्यांचे - भाग १७
- नशीब त्यांचे - भाग १८
- नशीब त्यांचे - भाग १९
- नशीब त्यांचे - भाग २०
- नशीब त्यांचे - भाग २१
- नशीब त्यांचे - भाग २२
- नशीब त्यांचे - भाग २३
- नशीब त्यांचे - भाग २४
- नशीब त्यांचे - भेटू भाग - २५
- नशीब त्यांचे - भाग २६
- नशीब त्यांचे - भाग २७
- नशीब त्यांचे - भाग २८
- नशीब त्यांचे - भाग २९
- नशीब त्यांचे - भाग ३०
- नशीब त्यांचे - भाग ३१
- नशीब त्यांचे - भाग ३२
- नशीब त्यांचे - भाग ३३
- नशीब हे शिकलो - भाग ३४
- नशीब हे शिकलो - भाग ३५
- नशीब हे शिकलो - भाग ३६
- नशीब हे शिकलो - भाग ३७
- नशीब हे शिकलो - भाग ३८
- नशीब हे शिकलो - भाग ३९
- नशीब हे शिकलो - भाग ४०
- नशीब हे शिकलो - भाग ४१
- नशीब हे शिकलो - भाग ४२
- नशीब हे शिकलो - भाग ४३
- नशीब हे शिकलो - भाग ४४
- नशीब हे शिकलो - भाग ४५
- नशीब हे शिकलो - भाग ४६
- नशीब हे शिकलो - भाग ४७
- नशीब हे शिकलो - ४८
- नशीब हे शिकलो - ४९
- नशीब हे शिकलो - ५०
- नशीब हे शिकलो - ५१
- नशीब भाग - ५२
- नशीब भाग - ५३
- नशीब भाग - ५४
- नशीब भाग - ५५
- नशीब भाग - ५६
- नशीब भाग - ५७
मी मराठी ५ वी - ६ वी (१९५८ - ६०) शिकत होतो तेव्हाची एक घटना कधीही न वीसणारी आहे. आमचा घर मालक एक राजस्थानी मारवाडी होता त्याची दोन समवयस्क मुले आमच्या बरोबर खेळायला येत असत. त्या दिवशी मी खेळायला बाहेर गेलो, बाकीच्या मुलांनी लगेच मला विचारले " ए रड्या आज हे गालावरचे नक्षीकाम कशामुळे ? " मी - "गृहपाठ केला नाही म्हणून." त्या मारवाडी पोरांना मी विचारले " तुमच्या तोंडावर नक्षीकाम का नसते ?" " आम्ही जिथे शिकवणीला जातो तिथल्याच एकाला थोड्या गोळ्या, बिस्किटे दिली की आमचा गृहपाठ तयार." "पण तुम्ही बर्याचदा शाळेत सुद्धा जात नाही, तेव्हा काय करता ?" " आम्ही शाळेला देणगी देतो, आमचे पिताजी सांगतात श्रीमंतांनी शाळा बनवायच्या मग हे शिकवलेले लोक आपल्या कामाला येतात." आधीच मार खाऊन डोकं सुन्न झाले होते हे असले काहीसे ऐकून जास्तच गार झाले.
त्या वयात त्या वाक्यांचा अर्थ तितकासा समजू शकलो नाही, पण आज, शिक्षण क्षेत्रांतील घोळकर मंडळींचा चालू असलेला घोळ पाहून, ह्या श्रीमंतांचा शिक्षणाचा धंदेवाईक उपयोग नीट डोक्यात शिरतो आणि डोके अजून जास्त भणभणते.
प्राथमिक, माध्यमिक शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ ही सारी ह्या श्रीमंतांच्या तथाकथित आशीर्वादाने चालणारी आधुनिक संस्थाने झाली आहेत. काल परवां पर्यंत जे तथाकथित कॄषि महर्षी होते तेच आज शिक्षण महर्षी गणले जातात. अश्या संस्थानातर्फेच शिकवलेले पदवीधर (हातात पदवीचा कागद मिरवणारे) शिक्षण व इतर मंत्रालयातील / कार्यालयातील पदाधिकारी होत आहेत. झुलॉजीची डॉक्टरेट मिळवलेल्या (कशी ?) एका अधिकार्याला भेटणे मला आवश्यक होते, कारण कला व तंत्राच्या सत्तेत त्यांचा सहभाग होता. आमच्या भेटीचे निष्पन्न काय असेल ह्याची कल्पना तुम्हाला आली असेलच !
माझ्या मुलाला एका बॅंकेचे पत्र आले. आम्ही भेटायला गेलो. चौकशी कक्षाने आम्हाला एका तरुणीकडे पाठवले. तो चेहरा बघताच संशयाने मी इंग्रजीतून विचारले " तुमच्या बॅंकेने हे पत्र पाठवले आहे मी कोणाला भेटू ?" त्या तरुणीने तो कागद दोनदा वर खाली बघितला, म्हणते "तुमचे खाते आमच्या बॅंकेत नाही" मी तिला तिच्या समोर ठेवलेल्या संगणकावर शोधायला सांगितले. ती "मी ह्या टेबलावर नवीन आहे" मी तडकलो " तुम्ही पदवीधर असालच, नवीन टेबलावर असण्याचा काय संबंध ?" ती "मी झुलॉजीची पदवीधर आहे, मला संगणक माहीत नाही" माझी खात्री झाली ही बया मराठी नाही. गैर मराठीच बेशरमपणाचे धाडस करू शकतो. " बाई तुमचं गांव कोणतं ?" ती "पटणा, बिहार, पण मी पुण्यात शिकले आहे" हा तर निर्लज्जपणाचा कळसच होता. मी आवाज वाढवला "ओ तुम्ही बिहारचा चारा संपला म्हणून इथे पुण्यात शोधायला का आलात ? जरुर ह्या बॅंकेत तुम्हाला थारा देणारा बिहारी अधिकारी असणार." लगेच बघ्यांची गर्दी जमली. खरोखरचा एक बिहारी अधिकारी तीच्या मदतीला पुढे धावला, "कायद्याने आम्ही बिहारी इंडियात कुठेपण काम करू शकतो." मी तापलोच होतो, "आमच्या बाबासाहेबांना कायदा तयार करताना ह्या कायद्याचा असा दुरुपयोग कोणी करेल असे वाटले नाही. हाच कायदा तुम्हाला तुमच्याच प्रदेशाची सुव्यवस्था राखण्याचे स्वातंत्र्य देतो ते कसे विसरलात.एक मराठी तरुणी पुढे सरसावली, तीच्या छातीवर टोचलेल्या बिल्ल्यावर नाव वाचले म्हणून समजले. माझे नाव रानडे आहे हे समजून देखील ती माझ्याशी इंग्रजीत बोलत होती " ही मुलगी इथे नवीन आहे, मी काय मदत करू ?" "मला ह्या घटकेला माझे खाते ह्या बॅंकेतून बंद करायचे आहे. कोणत्या अर्जावर कुठे स्वाक्षरी करू ते दाखवा." तिने मला एक अर्ज दिला त्यात एक रकाना होता - खाते बंद करण्याचे कारण - मी लिहिले - बेजबाबदार सेवा.
त्या कावीळवाल्या तांत्रिकाने हात चोळून मला कावीळ मुक्त केले होते. आता मी अशा असह्य परिस्थितीत हातावर हात चोळत बसलो असताना एका तांत्रिकाच्या शोधात आहे.
शेवटी काय तर - - नशीब माझे - - भेटू - - भाग - ४