माझ्या एका मित्राची घर घेण्यासाठी शोधाशोध चालू आहे. डोंबिवलीच्या चाळीत राहणारा तो मित्र १ वर्षानंतर लग्न करण्याची इच्छा आहे म्हणून वेगळं घर बघतो आहे.मला सुरवातीला यात काही विशेष वाटत नव्हत.पण नंतर कळाल वेगळं घर घेण्याची इच्छा त्याची स्वतःची नाही त्याच्या प्रेयसीची आहे.
एकूणच परिस्थितीतून मला भविष्याची फार काळजी वाटते कसे हि मुले तयार होतात वेगळे राहण्यासाठी. आज स्वतःच अस्तित्व घडवण्यासाठी वेगळे होत आहेत उद्या ते मिळवल्यावर आई वडिलांना विचारणार आहेत का ? स्वार्थी मुले आहेत ही यात वाईट याचंच वाटत की तो एकुलता एक आहे. एकदा वेगळे झाले की एरवी जाण किंवा त्यांना बोलावणं ह्यांना जमत नाही. बायकोच्या बाळंतपणाच्या वेळी किंवा मूल झाल्यावर ते सांभाळायला ह्यांना आई वडिलांना आपल्या घरी बोलावंस वाटत. मुलगा नोकरीसाठी परदेशी गेला तर मला त्यात काही वाटत नाही. पण ५-१० की.मी. अंतरावरून मुलगा फोनवर आपल्या आई वडिलांची खुशाली विचारणार याला काय अर्थ. आई वडिलांनी एवढं कष्ट करून वाढवलं त्यासाठी एका मुलीच्या ईछे साठी आपल्या आई वडिलांना सोडून दुसरं घर मांडायचं याची खरंच आवश्यकात आहे का ?
एकुलता एक असताना त्याच्या प्रेयसीचा हा हट्ट का त्याला आई वडिलापासून वेगळं करण्याचा. तिला स्वतःला एक भाऊ असताना त्याच्या बायकोने अशी मागणी केली तर.
पण हे सगळं कशासाठी भविष्यात सासू सुनेची भांडण नको की कोणाबरोबर तडजोड नको म्हणून.यात आमचं घर हि काही वेगळं नाही माझ्या आजी म्हणजे आईची आई आमच्या घरी राहते तीन भावांव्यतिरिक्त. यात मोठ्या सुनेने कहर केला म्हणून आम्ही तिला आमच्या घरी ठेवतो. आमच्या बाजूला एकत्र कुटुंब आहे. पर्वा त्या मित्राची आई चक्कर येऊन जिन्यावर पडली तर सुनेने काम करणाऱ्या मुलीला तिला बघायला पाठवलं का तर ती जेवण बनवत होती आणि गॅस वर अन्न शिजत होत.
या सगळ्यात मुलाने वेगळं घर घेणं आणि वेगळं राहणं हाच उपाय आहे का ?
१.या सगळ्यात सुनेला मुलाच्या आई बद्दल जिव्हाळा नसला तरी चालेल पण मुलाला तर आहे ना त्याने का आपल्या आई वडिलांना सोडायचं ?
२.प्रेयसी किंवा बायकोच्या तडजोडीसाठी आपल्या आई वडिलांशी तडजोड करावी का ?
३.या मुली मुलाच्या आईला आपली आई मानूच शकत नाही का ?
४.यावर आताच्या मुली फक्त पटणार नाही म्हणून वेगळं राहण्याची मागणी मुलाकडे करतात ते इतकं कस कठिण आहे ते मला कळत नाही. सासूचे ते टोमणे आणि आपल्या स्वतःच्या आईच बोलणं म्हणजे उपदेश असच काही आहे का ?