मैत्री पकिस्तानशी..

सध्या आपल्या मनोगत वर काश्मीर, पाकिस्तान, हिंदु-मुस्लिम विषय बर्‍याच आस्थेने आणि गंभीरपणे चर्चीले जात आहेत.
बर्‍याच दिवसापासुन माझ्या मनात हा विचार होता आणि काल प्रसाद यांची श्रीनगर यात्रा वाचुन माझ्या मनातील विचाराला चालना मिळाली कि, पाकिस्तानला आपल्याला भेट देता येईल का? वर्षानुवर्ष एकच विषय घोळत बसण्यापेक्षा, बौध्दीक आणि भाषा विलास करण्यापेक्षा, स्वखर्चाने १५/२० दिवसाचा दौरा आखायचा, तेथे विद्यार्थी, नौकरीदार, गृहीणी, धर्म पुरोहित, अल्पसंख्य, उद्योजक अशा समाजातील वेगवेगळ्या समाजातल्या सदस्यांना वैयक्तिक पातळीवर भेटायचे, आपली मते त्यांना सांगायची, त्यांची मते आपण समजावुन घ्यायची, तेथील नद्या, पर्वते, सुंदर जागा बघाव्यात, मंदिरे, गुरुद्वारे पाहावीत, असा विचार माझ्या मनात तरळत आहे.
मनोगती खालील माहिती देवु शकतील का?
१. पाकिस्तानला भेट देण्यासाठी कोणत्या वैधनिक गोष्टींची आवश्यकता असावी? ( पारपत्र वगैरे.)
२. आपल्या परिचयातील कोणी या मैत्री, सद्भावाच्या कल्पनेने पाकिस्तानमध्ये जावुन आला असेल तर त्याचा पत्ता, संपर्क इत्यादी माहिती.
३. या दृष्टीने कोणी महाजाळावर कार्य करत असतील तर त्यांची माहिती.
४. कोणत्यादृष्टीने माझ्यासारख्या माणसाने वैचारीक तयारी करावी, काही सल्ला, काही मार्गदर्शन.
५. अंदाजे किती खर्च येईल? तेथील हवामान, लोकांच्या आहाराविषयीची ( कारण मी पुर्णपणे शाकाहारी आहे ), आवडी-निवडी विषयीची माहिती .
६. कोणाची माझ्याबरोबर येण्याची इच्छा असेल तर अजुन उत्तमच, म्हणजे सोबतही होईल.
७. प्रवासवर्णन, पुस्तके यांची यादी. ( कोणी वाचलेली असल्यास).
८. पाकिस्तान मधील सध्याच्या सामाजिक समस्या ( जसे आपल्याकडे शिक्षणाचे व्यापारीकरण, समाजातील दुरी/दुरावा, वाढता वैद्यकिय खर्च, भ्रष्टाचार, सर्वसाधारण लोकांचे राजकारणापासुनचे फटकुन राहणे, वाढते शहरीकरण, मुळ प्रादेशिक भाषेचा होणारा लोप कि, जेणेकरुन समान समस्यांचा विचार मांडता येवु शकेल.). 
९. बाकी काही अवांतर माहिती इत्यादी इत्यादी.  

माझी कोणत्याही प्रकारची महत्वाकांक्षा नाही कि माझ्या भेटीने फार मोठा फरक पडेल, परन्तु अनुभवाने माझ्या सध्याच्या विचारांमध्ये काही बदल होवु शकेल अशी माझी रास्त अपेक्षा आहे.
अर्थात प्रसादने सांगीतल्या प्रमाणे या गोष्टीसाठी सर्वच स्तरावरुन विरोध होवु शकेल त्यामुळे मध्येच माझी योजना बारगळु नये म्हणजे मिळवली.

प्रतिसादाच्या अपेक्षेसह,


द्वारकानाथ.