राजकारण आणि आपण!

कुठलीही सामाजिक चर्चा सुरू झाली की शेवट बहुतेक वेळा "राजकारणी नालायक आहेत, भ्रष्ट आहेत इ.इ. वर येऊन थांबते. अगदी आपल्या मनोगतावर सुद्धा बहुतेक चर्चांत असे मत आढळते.


फक्त राजकारण्यांना शिव्या घालण्यापुरताच आपला आणि राजकारणाचा संबंध आहे का? "to change the system you have to be part of the system" हे वाक्य सर्वांना माहिती आहे, असा प्रयत्न कुणी केला आहे का?


या चर्चेचा उद्देश-- आपल्या पैकी कोणीही स्थानिक स्वराज्य संस्था, लोकसभा, विधानसभा इ. निवडणूकीत भाग घेतलाय का? कुठल्या राजकीय पक्षाचे काम केलेय का? तसे करताना सामान्य माणसाच्या हिताची भूमिका मांडलीय का?


----किमान  आपल्यापैकी कितीजण मतदानाचा हक्क बजावतात? मतदान करताना आपण कशाला जास्त महत्त्व देतो, - उमेदवाराचे कार्य, पक्षाची ध्येयधोरणे की आणखी काही?


माझ्यापासून सुरुवात करते मी आजतागायत कोणत्याही राजकीय निवडणूकीत मतदान केलेले नाही. जेव्हापासून मतदानाचा हक्क प्राप्त झाला तेंव्हापासून आजतागायत शिक्षणासाठी मी मतदारसंघाबाहेर वेगवेगळ्या ठिकाणी राहतेय.


पण आपल्यातले बहुसंख्य मनोगती राजकीयदृष्ट्या सुजाण आहेत ते मतदान करत असतीलच, कुणी राजकारणातही असतील.


तर मग आपल्या राजकीय कारकीर्दीविषयी माहिती द्या. (मतदानाविषयीच्या भूमिकेसह)


                                          साती काळे.