चिकटणे, चिकटवणे बरोबर कारण: चिकचिक, चिकट, चिकटवण, चिकटी, चिकटा, चिकण, चिकणा, चिकणी, चिकणमाती, चिकणसुपारी, चिकाटी, चिक्की इत्यादी शब्दांमध्ये चिकट हा मूळ अर्थ आहे आणि चि नंतर क येतो ट नाही. म्हणून चिटकणे/चिटकवणे बरोबर नाही.
तसेच नरसाळे, नसराळे नाही.
निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरण
पायाभूत सुविधांमध्ये सातत्याने होत असलेली दैनंदिन प्रगती पाहून यापुढे मनोगतासाठी निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरणाचा अंगीकार करणे उचित दिसत आहे. त्याप्रमाणे आवश्यक ते बदल व्यवस्थेत केले जात आहेत. manogat.prashaasak@gmail.com ह्या पत्त्यावर आपल्या अडचणी व/वा सुचवणी विपत्राने कळवता येतील.