मला हिंदुधर्म कां आवडतो?

मला हिंदुधर्म आवडतो याची दोन कारणे आहेत


१) हिंदुधर्मांत लोकशाही आहे. त्यांत मूर्तिपूजा करणाऱ्या आस्तिकापासून चार्वाकवादी नास्तिकापर्यंत सर्वांचा अंतर्भाव होतो. हिंदूंधर्मांतील कोणालाही  आपल्याच धर्मावर टीका करण्याचे व त्यांत बदल सुचविण्याचे स्वातंत्र्य आहे. या धर्मांत विविध विचारसरणीचा पुरस्कार करणारे अनेक ग्रंथ आहेत. त्यांत कुठल्या आचरणाचा काय परिणाम होतो ते सांगणाऱ्या अनेक कथा आहेत. पण कसे वागावे याबद्दल निवडस्वातंत्र्य आहे. 'अमुकच तऱ्हेने वागा नाहीतर तुम्ही हिंदू नाही' असे हा धर्म सांगत नाही. हिंदुधर्मांतील पूज्य दैवतांवर कितीही जहरी टीका केली तरी टीका करणाऱ्याला ठार करण्याचा किंवा त्याला धर्मबहिष्कृत करण्याचा फतवा कट्टर हिंदुत्ववादीही काढणार नाहीत हे नक्की. (हिंदुत्ववाद्यांची ऊठसूठ तालिबान्यांशी किंवा इस्लामी दहशतवाद्यांशी तुलना करणारे बेगडी निधर्मवादी हा महत्वाचा फरक सोयीस्करपणे नजरेआड करतात).


२) दुसरे म्हणजे हिंदुधर्माच्या तत्त्वज्ञानाप्रमाणे प्रत्येक मनुष्य परमात्मस्वरूप आहे व साधना करून तो आपल्या परमात्मस्वरुपाचा अनुभव घेऊ शकतो. पण इस्लामधर्मात खुदा सर्वशक्तिमान परमेश्वर असतो तर मनुष्य हा बंदा असतो. बंदा हा बंदाच राहतो, त्याचा कधी खुदा होत नाही. तसेच ख्रिश्चन धर्मांत परमेश्वर व  लेकरू (मनुष्य) यांतील दरी कायम राहते. लेकरू परमेश्वरस्वरूप कधीच होत नाही.  फारतर एखादा बंदा किंवा लेकरू आपणच परमेश्वराचे दूत असल्याचा दावा करू शकते. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर हिंदु तत्त्वज्ञान अधिक सकस व सकारात्मक आहे.


तुम्हाला हिंदुधर्म आवडतो का? आवडत असल्यास का आवडतो? वरील मुद्द्यांविषयी काय वाटते?