बोली भाषा आणि व्याकरण

भाषा लिहून व्यक्त करतो तेव्हा शुद्धलेखनाचे व्याकरणाचे नियम पाळावेत असे मला वाटते.


काल मी जेवलो नाहीचा उच्चार काल्मी जेव्लो नाही असा होऊ शकतो म्हणून तसे लिहायचे का? तशाने अर्थाचा अनर्थ होऊ शकतो.


 त्यामानाने इंग्रजी लिहिताना (अगदी अनौपचारिकही) नियम जास्त पाळले जातात. walk चा उच्चार wok असा होतो म्हणून तसे लिहिले तर चालेल का? psychology ऐवजी cykology किंवा तत्सम काही लिहिता का? 


मग आपल्या मातृभाषेलाच अशी दुय्यम वागणूक का?


भाषेचे नियम पाळणे म्हणजे भाषेचा मान राखणे आहे.  मराठी लोकांनीच जर अशी हेळसांड केली तर मराठीचा मान कसा टिकेल?
अगदी ज्योतिबा फुले वगैरे पुरोगामी मंडळींनीही लेखन करताना "पर म्या म्हंतू जितं तितं बामनास्नीच का म्हत्व द्याचं?" असले काही लिहिलेले नाही. उचित पुस्तकी भाषा वापरली आहे आणि तेच योग्य आहे.