"मुद्दा बरोबर" पद्धत मात्र चुकीची'च असे नाही...!

सर्वप्रथम... "ऱाज ठाकरेंचा.. विजय असो... बाळासाहेबांनंतर एकमेव खरा मराठी नेता.. आणि ह्या बिबळ्या वाघाला मन:पुर्वक आभार आणि सदिच्छा..... "

आज दुपारी कंपनीत गेलो तरी सगळं लक्ष "राज" यांच्या बातमीकडे होत... दिवसभर मित्रांन्ना फोन आणि SMS करून तेच अपडेटस मिळवत होतो.. आणि संध्याकाळी "जामीन" मिळाल्याचे समजले...   खुप आनंद झाला.. त्या भरात आपोआप हाताने टाळ्या वाजल्या  

परंतु आत्ता घरी येउन पुर्ण बातमी पाहतो तर अतिशय लाजिरवाणे आणि वेगळेच चित्र समोर आले...

१) "राज" ह्यांच्यावर वेगवेगळ्या ठिकणी खटले आहेत आणि आरोप प्रत्यारोपद्वारे अटक मिळवण्याचा सरकार'चा प्रयत्न पाहून किळस वाटली!

--- ईतक्या आतताईपणे हा निर्णंय घेण्याचा अट्टाहास का? आणि एकाच प्रकारच्या (तथाकथित) गुन्हे नोंदीबाबत वेगवेगळ्या ठिकाणी अटक कशाला? हा फुकट वेळ आणि मनुष्यबळ जर गेली १० वर्षे जे बलात्कार/बॉंब्स्फोट/चोरी/ ह्या अ-निर्णयीत गुन्ह्यांच्या मागे लावला तर योग्य होणार नाही का?

२) "मनसे" वर आणि राज ठाकरेंवर बंदी घालण्याच्या मागण्या??

-- केवळ मुर्खपणा! आज देशभरात, दंगे करणारे (विनाकारण बरं का), अतिरेकी कारवाया करणारे ग्रुप्स/पक्ष आहेत त्यांची आधी विल्हेवाट लावा.. सिमी-अल-कायदा-आउएसाय ह्यांच्या कारवायांमध्ये का बर शेपुट घातले जाते?

३) "ऱाज" ह्यांच्याविरुद्ध सर्व युपी. बिहार आणि हिंदी भाषिक सांसदेत एकत्र येउन बोलत होते.. आणि आपले नेते "मराठी" बाजुला ठेवून राज विरोधात कायद्यावर कायदे.. अन समन्स वर समन्स बजावत होते... अरे आता तरी जागे व्ह्या... स्वताःच्या मुलाबाळांचा तरी भविष्याचा विचार करा... आज जे आहे ते सुद्ध उरणार नाही असच चालू राहील तर..!

४) हिंदुहृदय सम्राटांनी - शिवसेनेने  "राज" ह्यांना पाठींबा नाही दिला तरी चालेल परंतु क्रुपया एक लक्षात घ्या.... आज तुम्ही "राज" हा एक वैयक्तिक मुद्दा बाजुला ठेवून "मराठी आणि महाराष्ट्र" वाचवण्याचा प्रयत्न केला नाही तर आज "राज" च्या बाबत्तींत जे घडत आहे ते.. प्रत्येक मराठी नेता/माणसाच्या बाबतीत घडू शकते कारण ही वेळ'च अशी आली आहे...! जर युपी बिहारी MLA-MPs एकत्र येउन एका मराठी नेत्याविरुद्ध ३०२ लावण्याचा विचार मांडत असतील तर सर्व मराठी नेत्यांनी एकत्र येउन त्याला उलथवून टाकले पाहिले... तरच - Together we can together we win चा विजय होईल... सर्व मराठी राजेशाही स्व-किय गद्दरांमुळेच गेली आहे तरी अत्ता आपाणच हि वेळ बदलली पाहिजे कारण काहीही झाल तरी " ऱाज ह्यांचा मुद्दा बरोबर आहे "!!

५) एक प्रश्न मनात आला..  "मध्ये राज ह्यांनी ज्या "जेट" एअरवेज च्या लोकांसाठी निदर्शने आणि आवाज उठवला होता.. ते जेट चे कर्मचारी कुठेही दिसले नाहित.. सर्वजण दंगे करू शकत नाहित.. परंतु ह्या पांढरपेशी आणि Status कॉन्शस लोकांनी निदान एक फ्लेक्स बोर्ड घेउन पोलिस स्टेशन/कोर्टाबाहेर पाठींबा व्यक्त करुनही कृतज्ञता दाखवली असती तर??