दिवाळी
क. : प्राची कर्वे
सडा पहाटे शिंपुनी, दारी रांगोळी काढुनी
लक्ष लक्ष दीप घेउन आली दिवाळी अंगणी
वसुबारस येता पहिली, टिळा गाईचे कपाळी
उटण्याचा स्पर्श सुगंधी, लज्जत फराळाची आगळी
उटण्याचा स्पर्श सुगंधी, लज्जत फराळाची आगळी
नरकचतुर्दशी होई साजरी, दुष्टांचा संहार करुनी
गोडवा प्रेमाचा वाढवी, पाडव्याचे गीत गाउनी
रंग डोकवी स्वप्नातुनी, गंध भरल्या पहाटेतुनी
लक्ष्मीपूजन होई, फटाक्यांच्या ग साक्षींनी
लक्ष्मीपूजन होई, फटाक्यांच्या ग साक्षींनी
सुखाचा पसरे प्रकाश, दु:खाचे दीप जाळुनी
बहीण भावाचे नाते, दृढ होई ओवाळुनी
नवचैतन्याची फुटे पालवी, आशा उमंगांची मांदियाळी
आली अंगणी दिवाळी, आली अंगणी दिवाळी
आली अंगणी दिवाळी, आली अंगणी दिवाळी
- प्राची कर्वे