क्षितिजाची रेघ
क. : प्रदीप वैद्य

तुझ्या डोळ्यातले गूज
माझ्या मनात मनात
माझ्या मनातले सारे
तुझ्या ओठांत ओठांत
हात दोन हातांमध्ये
भाषा एक स्पर्शांमध्ये
नाद वाजतो मनांचा
भारलेल्या श्वासांमध्ये
जन्म जन्मांच्या पल्याड
तुझा माझा एक गाव
तुझे माझे बंध तेथे
नाही त्यांचे काही नाव
असे एकरूप दोघे
एकमेका एकमेक
तुझ्या माझ्या भेटण्याला
नाही क्षितिजाची रेघ
- प्रदीप वैद्य