अळूवडी


साहित्य :

अळूची पाने २
हरबरा डाळीचे पीठ २ वाट्या
चिंचगुळाचे दाट पाणी २ वाट्या
लाल तिखट दीड चमचा
हळद अर्धा चमचा
धने जिरे पूड अर्धा चमचा
तीळ १ चमचा
चवीपुरते मीठ
तळणीसाठी तेल


कृती :

अळूची पाने धुवून पुसून घ्या. पसरट भांड्यामध्ये डाळीचे पीठ घ्या. नंतर त्यात लाल तिखट, धनेजिरे पूड,  हळद,  तीळ, मीठ  व चिंचगुळाचे पाणी घाला व हे मिश्रण चमच्याने ढवळून घ्या. ढवळताना पीठाच्या गुठळ्या राहणार नाहीत हे पाहा. नंतर जरूरीपुरते पाणी घालून हे मिश्रण थोडे पातळ करा. मिश्रण पेस्ट सारखे झाले पाहिजे इतपत पाणी घालून पीठ भिजवा. नंतर अळूचे एक पान उलटे करून एका ताटात ठेवा. त्यावर हे मिश्रण सर्व पानाला एकसारखे पसरा. नंतर त्यावर दुसरे पान उलटे ठेवा. परत हे मिश्रण सर्व पानाला एकसारखे पसरून घ्या. नंतर या पानाच्या कडेच्या दोन्ही बाजूने दुमडून घ्या व त्यावर डाळीचे मिश्रण पसरून लावा. आता खालच्या बाजूने पान गुंडाळावे. प्रत्येक गुंडाळीला डाळीचे मिश्रण लावत जा. याप्रमाणे या पानाची मोठी गुंडाळी तयार होईल. नंतर ही गुंडाळी मध्ये सुरीने कापा. या दोन छोट्या गुंडाळ्या कूकरमध्ये शिजवून घ्या. & शिजवलेल्या गुंडाळ्या बाहेर काढून एका ताटलीत ठेवा व खूप गार झाल्यावर सुरीने याच्या मध्यम आकाराच्या गोल चकत्या करून तेलात तळून घ्या.


- रोहिणी गोरे