मी तर तेव्हा माझा नव्हतो उरलो
क. : अज्ञात
- अज्ञात
निवांत जागी स्वप्ने घेऊन लपलो
आणि नेमका आठवणींना दिसलो
किती अचानक भेट नव्याने झाली
हासलीस तू... अन मीही अवघडलो
भवताल किती निर्मनुष्य झाले.. अन
एकटाच मी किती किती गजबजलो
तूच सांग मग.. दोष कुणाचा होता?
मी तर तेव्हा माझा नव्हतो उरलो
सुरू राहिली किलबिल रानामधली
सामसूमसा मी माघारी वळलो
- अज्ञात