तू व्यथा माळू नको
क. : दर्शन शहा (स्नेहदर्शन)

तू व्यथा माळू नको
आसवे ढाळू नको
जाळ लाखो वेदना
भावना जाळू नको
भावना जाळू नको
हा अबोला तोड तू
बोलणे टाळू नको
दुःख माझे अन तुझे
आज सांभाळू नको
आज सांभाळू नको
नेमके ते सांग ना
शब्द तू गाळू नको
राहिले कोरेच त्या
जीवना चाळू नको
जीवना चाळू नको
दर्शन शहा (स्नेहदर्शन)