आधी तुझा थोडा बहर दे
क. : जयंत कुलकर्णी

आधी तुझा थोडा बहर दे
मग द्यायचे तितके जहर दे
दे कर्ज म्हणुनी क्षण-मिठी, मग
बेशक तगाद्यांचे प्रहर दे
बेशक तगाद्यांचे प्रहर दे
परका किनारा एकटा मी
मज ओळखीची ती लहर दे
का कचकड्यांचे स्पर्श नुसते
हो वादळी, सच्चा कहर दे
हो वादळी, सच्चा कहर दे
असशील तू नजरेत जेथे
मज आरशांचे ते शहर दे
- जयंत कुलकर्णी
ह्या गझलेचे कवीने केलेले कवितावाचन इथे ऐकता येईल.