दिवाळी शब्दकोडे १

दिवाळी शब्दकोडे १
शब्दकोडे

सूचना :

आडवे शब्द डावीकडून उजवीकडे तर उभे शब्द वरून खाली लिहावयाचे आहेत.

शब्दकोडे  येथल्या येथे सोडवता / तपासता येईल. एकेका चौकोनावर टिचकी मारून तेथे अक्षरे लिहावी आणि इतर चौकोनांवर जावे.

शब्दकोडे सोडवण्यासाठी शुभेच्छा!

शोधसूत्रे :
आडवे शब्दउभे शब्द
गेलेल्या तीरात कणा मोडून घुसवला तर नाक घासत येईल (५)
आपण स्वतः अनुनासिकाविना पाणी आणलेत (२)
एक होता राजा, तो भूमिहीन झाला ।
आता केवळ उरला, पत्नीसाठी ॥ (२)
ताबडतोबीने दोन गकार आणण्यासाठी घाई करावी लागते (४)
फांदीच्या सुरुवातीला ही जोडली की राजाला शोभेलसा थाट होतो (२)
१०गर्मीत द्विरुक्तीने भिजणे की श्रमाचे लक्षण? (५)
१२मूळ लाक्षणिक उगम तपास चालतो (२)
१३भांडणांना गती नसेल तर चंद्रबिंबाचा सोळावा भाग (२)
१४लाख फायदा झाला तरी त्यात वाईट पाहाल (४)
१५चरणांसोबत तिष्ठले की त्यावरून चालता येते (४)
१७श्वानाला खाऊ घाला नाही तर हाकला -- एकच (२)
१८सदनी उलट बळाने शीर (२)
२०विश्रांतीतून हा निघून गेल्यावर आ वासून बघत राहणे एवढेच शिल्लक राहते (२)
२१प्यावे वा हे खावे (२)
२३ह्याने दिशा बदललली तर ह्याचा पोपट होतो (२)
२४ह्या सत्रात धारण करणारा द्विरुक्तीने बाजूस नेतात (५)
२६कृतक काकुळतीने केशवकुमारांनी केली कोणाच्या परतून येण्याची कामना? (३)
२८राज्याच्या राजधानीचा आदर घालवून नकार दिल्यास व्यापार होईल (३)
२९मिसळीवरील तेलाच्या थरातून अंग काढून घेतलेस तर उरलेले तुझेच (२)
३०भार नियमनाच्या काळात हे जवळ असलेले बरे (३)
३२गाळून, घोटून बदनाम झाली
सर्वामुखी ती तरीही वसली (२)
३३वाकलेल्यास सजावटीसाठी त्यात कलाबतू गुंफावी ही तर जगरहाटी (४)
३४ह्या ग्रंथी स्नेहसंमेलनांमध्ये उद्भवतात (४)
आण त्या रस्त्यापूर्वी तिसावे व्यंजन (३)
नेमाने अत्यंत सुंदर स्त्रीला दुय्यम दर्जा (३)
माळ घालण्याच्या ठिकाणी ही टळली तर मोठाच गलका होतो (५)
गेलेल्याला उलटे करून टिकून राहणे (३)
विहिरीत आभाळ पडले, त्यातच आवाज करू नका अशी सूचना (५)
दहशतीशी जवळीक साधणारा हिंदीभाषी हुतात्मा (३)
भाज्या उद्युक्त करणारी देवी (४)
११पक्ष्यांच्या समूहाला ग्रामीण भाषेत कधी दमवले की हा येतो (३)
१४छोट्यांचा ठाम निश्चय ह्याच काळात होतो (५)
१५एक धातू तीन फूट घेतल्यास सीमा होईल (४)
१६यज्ञ करा व गतप्राण व्हा, की हा येईल (४)
१९आलंकारिक मोलमजुरी (५)
२१वडाखालच्या कट्ट्यावर पान पडले तर परदेशी जाण्याची शक्यता (४)
२२किंमत मिळवण्यासाठी खाली टाक ते झाडावर पिकलेले फळ (२)
२५शरीराच्या अत्यंत महत्त्वाच्या भागाचे रक्षण करणारीला मध्येच नको म्हटल्याने ती रुसून कमरेशी जाऊन बसली (४)
२७ठुमरीची काजळ घातलेली सखी? (३)
२९दंडुक्यात उलटापालटा झालेला तालुक्याच्या गावातील अधिकारी (३)
३१कवितेत नेहमीचा अंत्य खाऊन टाकतात (२)

- मिलिंद फणसे, मीरा फाटक, वरदा व. वैद्य