दिवाळी शब्दकोडे २

दिवाळी शब्दकोडे २
शब्दकोडे
  • सूचना :
  • आडवे शब्द डावीकडून उजवीकडे तर उभे शब्द वरून खाली लिहावयाचे आहेत.
  • शब्द कधीही जाड ठळक रेघ ओलांडत नाहीत.
  • शब्दकोडे  येथल्या येथे सोडवता / तपासता येईल. एकेका चौकोनावर टिचकी मारून तेथे अक्षरे लिहावी आणि इतर चौकोनांवर जावे.
  • शब्दकोडे सोडवण्यासाठी शुभेच्छा!
शोधसूत्रे :
आडवे शब्दउभे शब्द
लेलेवाचून सकाळी प्रकाशले होते हे वजनदार असामीस अवकाशभ्रमण करायला सांगण्यासारखे वैराण (३)
सुरुवातीतच ना घुसला व माउलींच्या पंथापासून पोरका झाला (३)
१२कोणी राहत नाही तिथे काम आहे (३)
१५स्वयंप्रेरिकेस काना मागे ठेवून दिल्यास इथे निश्चित सरकारी पाहुणचार (२)
२१संक्षेपात लालूचा पक्ष अखेर अपेयपानाचे ठिकाण की पूर्णतया नरेशाच्या मनसबदारांची सभा? (६)
३२षडजाशी बुद्धीचा समास करणारी अनलंकृत माणसं (२)
३४आजच्यापूर्वी शाबासकी देऊन शेत पिकवतो (३)
४१कर्णपिशाच्चाची शिकवण (४)
४५तत्‌वाचून ईशचरणी गढलेला सडपातळ इंग्रज (२)
५१गुंडाळी चित्रपटाची लांबी मोजायला उपयुक्त (२)
५३उपवनात माज आलेल्यांच्या जोडीने चिडचिड (२)
५५वसुंधरेचा तप्त परंतु रसाळ उद्रेक (२)
ती विराट मुलगी अमलदार की वारसदार? (६)
संगणकाची भाषा शिकायला गावात जा (२)
उलट कांडून  घे आणि चाव (२)
स्त्री नसूनही फटाकडा कसा असू शकतो हा? (३)
नागरीत उभा दांडा फिरवला तर तिथे लोक जमतात (२)
पातळीत छेडाची संधी म्हणजे भीती (३)
२२शृंगारपूर्व सरंजाम उलट ज्या प्रकारचा आहे (२)
२५अल्पवयीन कृष्णकृत्ये (४)
३३बुद्धिमान (३)
३४कापून टाकायचे नाही तर जपून ठेवून वेळोवेळी नजरेखालून घालायचे (३)
३६नूतनला आधी शाबासकी अनिश्चित (३)
४२स्त्रैण मतभेदांनी पाणावणारा मूक साक्षीदार (२)

- मिलिंद फणसे, मीरा फाटक, वरदा व. वैद्य