चारोळ्या

१)
आज काहीतरी नवं लिहावं,
असं दरवेळी वाटतं...
पण, लिहिताना नेहमी जुन्याशीच संबंध जुळतो,
मग त्यात नवं काय उरतं....

२)
माझ्याकडे शब्द नाहीत,
प्रत्येक कलेची दाद द्यायला...
शब्दांनाही बंधनं असतात,
सगळ्यांसमोर व्यक्त व्हायला....

३)
पाऊस जोडतो नातं
जमिनीचं आकाशाशी...  
नाही तर तसा 'जवळचा' संबंध नसतो,
दोघांचा एकमेकांशी....

४)
आज वाटलं होता मला,
ह्या रात्रीच्या प्रवासात नक्की काहीतरी सुचेल...
शब्दांनी का होईना पण, कविता माझी
पावसाचे चार थेंब अलगद वेचेल....


- मयूर ढोले