गप्पच राहतो..
क. : सिद्धेश साने


आज काल मी गप्पच राहतो
न बोलता माझं मन,
कुणाला कळतंय का? ते पाहतो..
आज काल मी गप्पच राहतो...
खूप झालं ओरडून सांगणं
खूप झालं हक्कानं मागणं
मी न मागता कुणी मला समजून घेतंय का? ते आजमावतो..
आज काल मी गप्पच राहतो...
या बेगडी दुनियेत घडणाऱ्या गोष्टींचं ओझं सहन होईनासं झालं की,
दूरवर एकटाच उभा राहून
मीच माझं गाणं गातो...
आज काल मी गप्पच राहतो..
पूर्वी मी खूप भांडायचो
पूर्वी मी खूप सांगायचो
आता हे सगळं जमत नाही
या गोष्टीत मन आता रमत नाही...
म्हणूनच की काय?
समोर घडणाऱ्या सर्व घटना निर्जीव होऊन पाहतो...
आज काल मी गप्पच राहतो...
-सिद्धेश साने