रव्याचे आप्पे
ले. : सौ. स्वाती भिडे
साहित्य :
जाड रवा - २ वाट्या
दही आंबटसर
बारीक चिरलेला कांदा - १
हिरव्या मिरचीचे तुकडे
आल्याची पेस्ट
कोथिंबीर
मीठ चवीनुसार
सोडा - १ चमचा
कृती:
रात्री रवा व दही एकत्र सरसरीत कालवून ठेवावे. दुसरे दिवशी सकाळी त्यात चिरलेला कांदा, मिरचीचे तुकडे, आल्याची पेस्ट, मीठ, कोथिंबीर व सोडा घालून मिश्रण कालवावे. आप्पेपात्राला थोडेसे तेल लावून वरील मिश्रण घालून आप्पे करावे. वर झाकण ठेवावे. नंतर उलटे करून थोडेसे तेल सोडून तळावेत. गरम गरम आप्पे नारळाच्या हिरव्या चटणी अथवा सॉस बरोबर वाढावेत.
- सौ. स्वाती भिडे