कुरकुरीत तिखट शेव

साहित्य :

बेसन - ३ वाट्या
तेल - १/२ वाटी
पाणी - १/२ वाटी
सोडा - छोटा पाव चमचा
तिखट - ३ चमचे
मीठ
हिंग
ओवा - १ चमचा

कृती :

एका पातेल्यात तेल व पाणी एकत्र करून घ्या. त्यात वरील सर्व साहित्य एकत्र करा. मग त्यात हळूहळू पीठ घाला. शेव-चकली घालण्याच्या सोऱ्यामधली मध्यम आकाराच्या भोकांची ताटली घ्या. शेव जाड हवी असेल तर मोठ्या आकाराच्या भोकांची ताटली घ्या. एका कढईत पुरेसे तेल घालून मोठ्या आचेवर शेव तळून घ्या. शेव लगेच उलटावी. फार लालसर काढू नये. कागदावर काढून घ्यावी. मग हवाबंद डब्यात भरावी.

टीप :

हे प्रमाण ३ वाटी पिठाचे आहे. दिवाळीसाठी लागणारे प्रमाण ६ वाटी घ्यावे.


- अंजली फाटक