मूगदळ वडी
ले. : सौ. स्वाती भिडे
साहित्य :
मूगदळ (मुगाच्या डाळीचे पीठ) - २ वाट्या
पिठीसाखर - २ वाट्या
साजूक तूप - १ वाटी
वेलची पूड - १ चमचा
केशरी दूध मसाला - १ चमचा
कृती :
कढईत तूप घालून मूगदळ खमंग परतावे. हे मिश्रण थंड करण्यास ठेवावे. नंतर त्यात पिठीसाखर, वेलची पूड घालावी. वड्यांच्या ट्रेला थोडेसे तूप लावून घ्यावे. तयार मिश्रण ट्रेमध्ये थापावे. वर केशरी दुधाचा मसाला पेरावा. चौकोनी वड्या कापाव्यात. झाल्या झटपट आणि पौष्टिक मूगदळ वड्या तयार!
- सौ. स्वाती भिडे