टिचकीसरशी शब्दकोडे ४३

टिचकीसरशी शब्दकोडे ४३

शब्दकोडे
  • सूचना :
  • आडवे शब्द डावीकडून उजवीकडे तर उभे शब्द वरून खाली लिहावयाचे आहेत.
  • शब्द कधीही जाड ठळक रेघ ओलांडत नाहीत.
  • शब्दकोडे  येथल्या येथे सोडवता / तपासता येईल. एकेका चौकोनावर टिचकी मारून तेथे अक्षरे लिहावी आणि इतर चौकोनांवर जावे.
  • शब्दकोडे सोडवण्यासाठी शुभेच्छा!

शोधसूत्रे :

आडवे शब्द उभे शब्द
वापर व चाकोरीत अडकलेले सायंकालीन पाठांतर. (४)
११ ओलावा नसणारे फटके. (३)
१४ प्रवासात नकार  नसण्याची शर्त. (२)
२१ परके निश्चय म्हणजे पुनर्विवाह? (५)
३२ ढकलणे आणि रागावणे. (४)
४१ रिकामेपण कमी करत कार्य केल्यास रेशमाची नक्षी तयार होईल. (५)
कोपरा उलटवल्यावर गरज नाही. (२)
पाठीमागून प्रवेश करण्यासाठी इतरांच्या मागे कायम रमणारा. (५)
धनुष्याचा टणत्कार होण्यात आयुर्वेदिक औषध घेण्याची एक पद्धत आहे. (३)
१३ टोणगे परत फिरतील अशी मोठी भांडी. (२)
२४ कपट कारस्थानात मिळणारे शिरस्त्राण. (३)
३१ सदाचारी माणूस उलटेल असा फायदा. (२)
३३ साहाय्य देणारा  गेल्यावर म्हणणे. (२)