टिचकीसरशी शब्दकोडे २५

टिचकीसरशी शब्दकोडे २५

शब्दकोडे
  • सूचना :
  • आडवे शब्द डावीकडून उजवीकडे तर उभे शब्द वरून खाली लिहावयाचे आहेत.
  • शब्द कधीही जाड ठळक रेघ ओलांडत नाहीत.
  • शब्दकोडे  येथल्या येथे सोडवता / तपासता येईल. एकेका चौकोनावर टिचकी मारून तेथे अक्षरे लिहावी आणि इतर चौकोनांवर जावे.
  • शब्दकोडे सोडवण्यासाठी शुभेच्छा!

शोधसूत्रे :

उभे/आडवे शब्द
रौप्यमहोत्सवी शब्दकोडे कोण सोडवत आहे? (१)
पडवीतून दागिना नाहीसा झाल्यावर कोणी हाक मारल्यास असा प्रतिसाद द्यावा. (१)
हे करणाऱ्याचा दिवस सप्ताहान्ती येतो. (१)
पाढ्यांव्यतिरिक्त इतरत्र कोठे फारसा न दिसणारा दोन अर्थ असणारा शब्द! (१)
ह्या अंकाला कडा लावूनही किंमत तीच. (१)
११ मी येण्याने फरक न पडणारे क्षेत्र. (१)
१२ खेळाच्या नावात दोघे असले तरी खेळताना एकाचाच उल्लेख होतो. (१)
१३ ह्या गृहस्थाचा पैशात एक तृतीयांश वाटा असे. (१)
१४ नियतकालिक प्रवासात प्रशंसा नसताना मिळणारे अनुमोदन. (१)
१५ बन असे म्हणताना तोंडून बाहेर पडणारी मान्यता. (१)
२१ हा शब्द मराठीत नाही, गुजरातीत आहे! (१)
२२ मुलीस संबोधताना होणारा गर्वाचा स्पर्श. (१)
२३ फजितीच्या प्रसंगी उडण्याऱ्या दोन जुळ्यांतली एक. (१)
२४ वैकल्पिक प्रशंसोद्गार. (१)
२५ देवाच्या नामस्मरणाच्या आरंभीच शिसारी? (१)
३१ भोवती गाव जमला तरी ह्याच्या अकलेत फरक पडणार नाही! (१)
३२ मैत्रीनंतर येऊन मैत्री तोडणारा उच्छ्वास. (१)
३३ एकटा दुकटा कसाही असला तरी बापच! (१)
३४ प्रशंसेचा आकार नाही आणि अर्थ आहे असे अव्यय. (१)
३५ भावाने तेज गमावल्यावर डोक्यात येणारा किडा! (१)
४१ मृत पांढरपेश्यांचा समूह. (१)
४२ अवहेलना करताना वापरल्या जाणाऱ्या जोडगोळीपैकी दुसरी. (१)
४३ वृक्षास किंवा काव्यास जन्म देण्यास कारणीभूत. (१)
४४ संगतीने येणारा अस्वच्छतादर्शक उद्गार. (१)
४५ मराठीत सांगितले तर दूर जावे; पण हिंदीत सांगितले तर चिकटावे, अशी आज्ञा. (१)

टीपा :

१. हे रौप्यमहोत्सवी शब्दकोडे बनवताना सर्व एकाक्षरी शब्द निवडलेले आहेत. असे शब्द इतर शब्दांपासून तोडावे लागत असल्याने सामान्यतः शब्दकोड्यात वापरता आलेले नव्हते. मात्र पंचवीसाव्या शब्दकोड्यात असे शब्द वापरून एका अर्थाने एका कोड्यात पंचवीस स्वतंत्र शब्दकोडी तयार झालेली आहेत.

२. ह्या शब्दकोड्याची शोधसूत्रे बनवताना 'मीरा फाटक' ह्यांचे महत्त्वाचे साहाय्य झालेले आहे.