टिचकीसरशी शब्दकोडे ५४

टिचकीसरशी शब्दकोडे ५४

शब्दकोडे
  • सूचना :
  • आडवे शब्द डावीकडून उजवीकडे तर उभे शब्द वरून खाली लिहावयाचे आहेत.
  • शब्द कधीही जाड ठळक रेघ ओलांडत नाहीत.
  • शब्दकोडे  येथल्या येथे सोडवता / तपासता येईल. एकेका चौकोनावर टिचकी मारून तेथे अक्षरे लिहावी आणि इतर चौकोनांवर जावे.
  • शब्दकोडे सोडवण्यासाठी शुभेच्छा!

शोधसूत्रे :

आडवे शब्द उभे शब्द
पवित्र पाण्यात अस्वच्छतादर्शक उद्गार मिसळल्यास ते उद्यावर ढकलले जाईल. (४)
११ ही भाजी वाढतात आणि हे मुलांना वाढवतात. (३)
१४ इथे पोहोचल्यावर बुद्धी भ्रष्ट होते असे म्हणतात. (२) 
२१ दुष्टांशी मैत्री की पाणी साठण्यास अनुकूल परिस्थिती? (३)
३३ शिकारीसाठी चाळीस शेरात मालकीदर्शक प्रत्यय मिसळावा. (३)
४१ ह्या शब्दात तोचतोचपणा असला तरी अर्थ मात्र विविध. (२)
४३ विहिरीला दोन डझनांत दोन कमी. (३)
भरल्या पोटी केलेली भक्ती. (४)
फसवणुकीत गर्वाची लागण होऊ न देणारा पक्ष. (२)
कशा प्रकारे कमरेचा बटवा?   (२)
जखमांच्या अष्ट खुणा।
स्मरण देती सतत मना (४)
१३ कायदा आणि वनस्पतिशास्त्राशी निगडित ही वस्तू लिहिण्याच्याही कामी येते. (३)
२२ मौल्यवान रत्नांचे भांडार मिळवण्यासाठी आकाशाला शिडी लावावी लागेल. (३)
२४ किल्लीची प्रशंसा करता करता कविता नजरेखालून घालावी. (३)

(काही शब्द आणि शोधसूत्रे बदलली : प्रशासक)