टिचकीसरशी शब्दकोडे ३८

टिचकीसरशी शब्दकोडे ३८

शब्दकोडे
  • सूचना :
  • आडवे शब्द डावीकडून उजवीकडे तर उभे शब्द वरून खाली लिहावयाचे आहेत.
  • शब्द कधीही जाड ठळक रेघ ओलांडत नाहीत.
  • शब्दकोडे  येथल्या येथे सोडवता / तपासता येईल. एकेका चौकोनावर टिचकी मारून तेथे अक्षरे लिहावी आणि इतर चौकोनांवर जावे.
  • शब्दकोडे सोडवण्यासाठी शुभेच्छा!

शोधसूत्रे :

आडवे शब्द उभे शब्द
सुगंधी फलार्धानंतर मज्जाव होईल अशी जखमी स्थिती (४)
११ केसांमधली ऱ्हस्वा आली माजावर? छे! छे! हा तर तरूण तत्पर (३)
१४ यास देशी लावता तुम्ही तुमच्या देशी कसे रहाल? उडून जाल! (२)
२१ असा कोणी जो जाणी दुज्या अंतरीचे (५)
३१ आंग्लकाळीन पदवी मिरवणारा आलाय मोठा साहेबराव (५)
४१ आहे ठिकाण मुंबईजवळी, तह करावा येथे खात खात केळी (३)
४४ येथे विश्वेश्वर भेटतात (२)
पांडवांची सभा बनविणारा यक्ष उलटला आणि सक्षात मृत्युदेव प्रगटला!(२)
यास रुपया जोडता, खणखणीत होईल हजर गडी (२)
पायामध्ये येता उलटून उजेड पडेल (२)
रंग बदलुनी जरी धावतो, कुंपण दिसताक्षणी थांबतो. (३)
११ अमीरापाठी येती श्रीमंत खासे. (४)
२२ वस्त्र बदलुनी ईश प्रार्थना फेडावी (३)
२३ श्रद्धेय संतास दडवून प्राण्यांस मारिशी का? (३)
३४ बरे आहे का असा हट्ट धरणे? (२)
३५ निजतनुवरी अशी उचलते कपास. (२)