टिचकीसरशी शब्दकोडे ३०

टिचकीसरशी शब्दकोडे ३०

शब्दकोडे
  • सूचना :
  • आडवे शब्द डावीकडून उजवीकडे तर उभे शब्द वरून खाली लिहावयाचे आहेत.
  • शब्द कधीही जाड ठळक रेघ ओलांडत नाहीत.
  • शब्दकोडे येथल्या येथे सोडवता / तपासता येईल. एकेका चौकोनावर टिचकी मारून तेथे अक्षरे लिहावी आणि इतर चौकोनांवर जावे.
  • शब्दकोडे सोडवण्यासाठी शुभेच्छा!

शोधसूत्रे :

आडवे शब्द उभे शब्द

पाण्यातले दगड । हातात रगड
दर्यात बुडले । खेळात उडले (५)
११
गुळाचे हात काढलेले आधुनिक वाल्मिकी ह्या झाडावर बसले (२)
१३ ह्याचा कावळा केला । लहानाचा मोठा झाला ॥ (३)
२२ गणपतीच्या चेल्यांच्या समूहाचे कूळ आप्तस्वकीयांना विचारा (४)
३१ आकाशातला छोटा दगड वाममार्गी लागला तर पायताण चढवा (३)
३४ अंतःकरणात उलट नमस्कार कर (२)
४१
छपराला उलटे कराल तर कपडा मांडून खेळावे लागेल (२)
४३ वारकऱ्यांच्या हाती अगदीच कंटाळवाणे घोका (३)
प्रवासात लहानांना न्याल तर खूप मोठेपणा मिळेल (३)
समूहाने गडावर ढग आपटून हसण्याचा मोठा आवाज आला (५)
हा कुंभार कविता करतो। कळीचा मुद्दा सुंदर दिसतो (५)
मोठी तोऱ्यात मिरवेल (३)
१३ तरीही प्रतिज्ञा केली (२)
३१ उलटून वाद्याच्या सुरुवातीची विक्री (२)
३३ आजच्या दिवशी मागून बघशील तर सत्यनारायणाचा प्रसाद मिळेल (२)
३५
तो उघडा राहिला तर पाणी पुण्याच्या बसथांब्यावर जाईल (२)