टिचकीसरशी शब्दकोडे ३७

टिचकीसरशी शब्दकोडे ३७

शब्दकोडे
  • सूचना :
  • आडवे शब्द डावीकडून उजवीकडे तर उभे शब्द वरून खाली लिहावयाचे आहेत.
  • शब्द कधीही जाड ठळक रेघ ओलांडत नाहीत.
  • शब्दकोडे  येथल्या येथे सोडवता / तपासता येईल. एकेका चौकोनावर टिचकी मारून तेथे अक्षरे लिहावी आणि इतर चौकोनांवर जावे.
  • शब्दकोडे सोडवण्यासाठी शुभेच्छा!

शोधसूत्रे :

आडवे शब्द उभे शब्द
आपले म्हणणे हातात बाळगणारा सागराएवढा साहित्यिक. (४)
११ वादग्रस्ताची सुरुवातच केली नाही तर हे वाजवता येईल. (२)
१३ तोड-जोड करणारी दोन अव्यये किंवा दोन फाटके एकत्र आल्यास साधारण सहा फूट जागा आरामात मिळेल. (२) 
३२ ही शेतीविषयक गोष्ट तमाशा चुकून लाडात आला तर होईल. (४)
४१ कवितेला गाण्यात रूपांतरित करताना गोंधळ होणे हे अति  हव्यास असण्यासारखेच  आहे. (५)
मूकपणे प्रशंसेस पात्र ठरलेला. (५)
पेयाचे पात्र पेय पिणाऱ्यास. (४)
मिठी नसलेली विकारहीन कविता (३)
देवळाच्या समोर  ही पाहिल्यावर उलट पावली घरी यावेसे वाटते. (२)
१३ गुंगून जाण्याचा पर्याय निवडल्याने मोठेच भांडण पेटले. (३)
२५ हे केल्यास कधी कानावर मधुर आवाज येतो तर कधी कानाखाली काडकन आवाज येतो. (३)